शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम शेतीकडे वाढता कल

By admin | Updated: June 15, 2014 00:35 IST

नांदेड : गेल्या काही वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे वळू लागला असून यंदा जिल्ह्यात जवळपास १५० एकरात तुतीची लागवड होणार असून यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले़

नांदेड : गेल्या काही वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे वळू लागला असून यंदा जिल्ह्यात जवळपास १५० एकरात तुतीची लागवड होणार असून यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले़२०१४-१५ मध्ये जिल्ह्याला तुती लागवडीसाठी १५० एकरचा लक्षांक दिलेला असून यासाठी शेतकऱ्यांकडून रेशीम कार्यालयाकडे नोंदणी झालेली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त लोहा व नांदेड या दोन तालुक्यांत रेशीमचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय देगलूर, मुखेड, मुदखेड व कंधार, हदगाव आदि तालुक्यातील शेतकरीही आता रेशीम शेतीकडे वळू लागला आहे. जिल्ह्यात १८४ जुने शेतकरी असून त्यांनी १९१ एकरावर तुतीची लागवड केलेली आहे. या वर्षात तुतीच्या बेण्याची निर्मिती जिल्ह्यातच व्हावी, तसेच बेण्याचा तुटवडा भासणार नाही, यासाठी नवीन रोपवाटिका तयार केल्या असून त्यामुळे आता जागेवरच बेणे उपलब्ध होणार आहे.नैसर्गिक आपत्ती, मजूर व भांडवलाचा अभाव, बेभरवशाची बाजारपेठ, पाण्याची कमतरता, कीटकनाशके, बी-बियाणांच्या वाढत्या किमती यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेती पर्याय वाटत आहे. जास्तात जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, यासाठी शेतकऱ्यांसाठी विविध स्वरुपाच्या सुविधा दिल्या जातात. यात एका एकरासाठी ६७५० रुपये अनुदान लागवड एक हेक्टर मर्यादेपर्यंत दिली जाते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत एकरी २० हजार रुपये अनुदान दिले जाते. ३ वर्षात पहिल्या वर्षी ६ हजार रुपये रोख, ८ हजारांचे साहित्य व उर्वरित सहा हजार रुपये पुढच्यावर्षी दिले जातात. याशिवाय कीटक संगोपन गृहासाठी (शेड उभारणी) १ लाख रुपये अनुदान दिले जाते. तसेच प्रतिएकर ठिबक सिंचनासाठी २२५०० रुपयाचे अनुदान दिले जाते.३१ मार्च २०१३ पर्यंत १६५ शेतकऱ्यांना १७७ एकरसाठी ७९६६३ अंडी वाटप केली होती. त्यापासून ४०३१३ किलोचे कोष उत्पादन झाले आहे. त्याला सरासरी ४०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. यापासून अंदाजे १ कोटी ६१ लाख २५५०० रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. नांदेडच्या बाजारात शासनाचा १७८ रुपये किलो दर आहे, परंतु हेच दर बंगळुरु येथील रामनगर मार्केटमध्ये ४०० रुपये किलोपर्यंत मिळतो. यामुळे या भागातील सर्वच शेतकरी उत्पादित केलेल्या कोषाची विक्री बंगळुरु बाजारपेठेत करतात. (प्रतिनिधी)