शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

पोलीसदीदींच्या आधाराने मुलींचा वाढतोय आत्मविश्वास; रोडरोमिओेंच्या हीरोगिरीला बसतोय लगाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 7:13 PM

आज अडचणीत सापडलेल्या महिलांना आणि मुलींना पोलीसदीदींचा आधार वाटू लागला आहे आणि या दीदींच्या धाकामुळे रोडरोमिओंच्या हीरोगिरीलाही लगाम बसतोय.

ठळक मुद्दे बाहेरगावाहून आलेल्या आणि विवंचनेत असलेल्या तरुणींना मिळाला दिलासाअनेकदा मुली सगळ्यांसमोर तक्रार करायला, अडचणी सांगायला घाबरतात; पण फोनवर त्यांच्या अडचणी मोकळेपणाने बोलून दाखवितात, असेही काही पोलीसदीदींनी सांगितले.

- ऋचिका पालोदकर 

औरंगाबाद : बाहेरगावाहून ती औरंगाबादेत शिकायला आली होती त्यामुळे हॉस्टेलमध्ये राहायची. या शहरात तिचे कोणीही नातेवाईक नव्हते. अशातच एक मुलगा तिचा पाठलाग करू लागला. रोजच त्रास द्यायचा. ती वैतागून गेली. नवे शहर आणि हा असा त्रास पाहून घाबरून गेली; पण अनोळखी शहर, अनोळखी लोक अडचण सांगणार तरी कोणाला? या विवंचनेत ती अडकलेली.  शेवटी आई-वडिलांना फोन केला आणि त्यांना अडचण सांगितली. आई-वडील त्वरेने इथे आले. त्या मुलाला दमदाटी केली; पण त्याने काहीही दाद दिली नाही. आपल्या मुलीची या प्रकारात नाहक बदनामी होऊ नये, म्हणून शेवटी त्यांनी मुलीला शिक्षण सोडून देऊन पुन्हा आपल्या गावी नेण्याची तयारी केली. अशातच या मुलीला ‘पोलीसदीदी’ची माहिती मिळाली. तिने त्यांचा आधार घेतला आणि त्या मुलाला चांगलाच धडा शिकविला. आज त्या मुलीची समस्या तर दूर झालीच पण ‘पोलीसदीदी’ची साथ मिळाल्यामुळे आत्मविश्वासही वाढला. 

आज अडचणीत सापडलेल्या महिलांना आणि मुलींना पोलीसदीदींचा आधार वाटू लागला आहे आणि या दीदींच्या धाकामुळे रोडरोमिओंच्या हीरोगिरीलाही लगाम बसतोय. पोलीस उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे यांनी दोन महिन्यांपूर्वी शहरात ‘पोलीसदीदी’ पथक सुरू केले. पोलीस निरीक्षक किरण पाटील यासाठी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणा-या महिला पोलीस उपनिरीक्षक त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ‘पोलीसदीदी’ म्हणून ओळखल्या जातात. 

शहरातील मुलींनी, महिलांनी अधिक बोलते व्हावे, त्यांच्या काही अडचणी असतील, तर त्या मोकळेपणाने सांगाव्यात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मुलींच्या मनातून पोलिसांविषयीची भीती दूर व्हावी, या उद्देशाने हे पथक स्थापन करण्यात आले आहे. आपल्या हद्दीतल्या शाळा, कॉलेज किंवा क्लासेस सुटण्याच्या वेळेत त्या भागात गस्त वाढविणे, मुलींशी थेट संवाद साधणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे, शाळा- महाविद्यालये- क्लासेस या ठिकाणी जाऊन मुलींना पोलीसदीदी पथकाची माहिती सांगणे, असे काम या उपक्रमांतर्गत पोलीसदीदींच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. अनेकदा मुली सगळ्यांसमोर तक्रार करायला, अडचणी सांगायला घाबरतात; पण फोनवर त्यांच्या अडचणी मोकळेपणाने बोलून दाखवितात, असेही काही पोलीसदीदींनी सांगितले.

 समुपदेशनाचे तंत्राचा वापर एकतर्फी प्रेमातून किंवा आकर्षण म्हणून शाळकरी, महाविद्यालयीन तरुणींना त्रास देणारी मुले अनेकदा कमी वयाची असतात. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदविता येत नाही. त्यामुळे या मुलांसाठी आम्ही समुपदेशनाचे तंत्र अवलंबितो. यामध्ये मुलगा, मुलगी आणि त्यांचे दोघांचेही पालक यांना एकत्रित बसवून पालकांसमोरच मुलांना समज देण्यात येते. यातील अनेक घटना गंभीर नसतातही; पण पुढे जाऊन याच किरकोळ घटना उग्र रूप धारण करू नयेत, यासाठी पोलीसदीदी पथक कार्यरत आहेत.     - किरण पाटील, पोलीस निरीक्षक

बचत गटातील महिलांनाही आधारआमच्या हद्दीत येणा-या बचत गटांनाही आम्ही कायम भेटी देतो. यामध्ये महिला त्यांच्या तक्रारी आमच्यापुढे मांडतात. अनेक जणींना दारुड्या नव-याकडून मारहाण सहन करावी लागते, अशा वेळी आम्ही त्यांच्या नवºयांना समज देतो, धाक दाखवितो. पोलीसदीदी उपक्रमांतर्गत आम्ही बचत गटातील महिलांचे आणि वसतिगृहातील रेक्टर्सचा समावेश असलेले व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. या माध्यमातून त्यांच्या अडचणी आमच्यापर्यंत अधिक जलद पोहोचतात. या उपक्रमांतर्गत प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहेच; पण मुलींनीही अधिक बोलते होऊन त्यांच्या अडचणी धीटपणे मांडल्या पाहिजेत. - वर्षाराणी आजळे, पोलीस उपनिरीक्षक 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस