शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

वाढलेल्या ‘पार्‍याची कमाल’

By admin | Updated: May 26, 2014 01:16 IST

औरंगाबाद : शहरात उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर गेल्याने रविवारी दुपारी घराबाहेर पडण्यापूर्वी औरंगाबादकर दहा वेळेस विचार करीत होते.

औरंगाबाद : शहरात उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर गेल्याने रविवारी दुपारी घराबाहेर पडण्यापूर्वी औरंगाबादकर दहा वेळेस विचार करीत होते. ‘वाढलेल्या पार्‍याचा’ सर्वाधिक फटका रविवारच्या आठवडी बाजाराला बसला. ग्राहकांनी तर पाठ फिरवलीच. विक्रेत्यांनाही भरदुपारी आपला गाशा गुंडाळावा लागला. गरिबांचा ‘निराला’ बाजार म्हणून ओळखल्या जाणार्‍या जाफरगेट येथील आठवडी बाजारात आज वर्दळ अजिबात नव्हती. उन्हाचा पारा चढल्याने दुपारी तुरळक प्रमाणात ग्राहक बाजारात आल्याचे दिसून आले. इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, हार्डवेअर विक्रेत्यांनी दुपारी ४ वाजेनंतर गाशा गुंडाळणे सुरू केले. एरव्ही हे विक्रेते सायंकाळी ७ वाजेपर्यंत थांबत असतात. भाजीबाजारात आज निम्मेच विक्रेते दिसून आले. एरव्ही येथे आठवड्याची भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. दरवेळी भाज्या पुरत नाहीत. आज मात्र निम्म्यापेक्षा जास्त भाज्या शिल्लक राहिल्याचे अंबादास सोनवणे या विक्रेत्याने सांगितले. कपडे विक्रेता खलीलभाई यांनी सांगितले की, आज लग्नतिथी असल्याने ग्राहकच नव्हे तर विक्रेतेही बाजाराकडे फिरकले नाहीत. आम्ही हातगाडी लावली; पण सकाळपासून चारच कपडे विकले. इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रेता सलीमभाई म्हणाले की, आजचा रविवार आमच्यासाठी ‘ब्लॅक डे’ ठरला. बाजारात अगोदरच वर्दळ कमी. त्यात काही ग्राहक आले होते तेही नुसतेच चौकशी करून निघून गेले. सेकंड हँड टीव्ही विक्रेत्यांकडे बोहणीसुद्धा झाली नव्हती. बाजारात येण्या-जाण्याचे भाडे खिशातून भरावे लागले, अशी प्रतिक्रिया सोहीलभाई यांनी व्यक्त केली. सरबत विक्रेत्यांची चांदी उन्हाचा पारा चढल्याने सरबत पिण्याकडे ग्राहकांचा कल वाढला होता. अवघ्या ५ रुपयांत मिळत असल्याने प्रत्येक जण दोन ते तीन ग्लास सरबत पीत होता. ‘आज नगद कल उधार’, ‘शरबत कूल, धूप गुल’ असे ओरडत सरबत विकले जात होते. जुना टीव्ही द्या आणि नवा टीव्ही घरी घेऊन जा, अशी आॅफर विविध इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये सुरू आहे. यात जुना एलसीडी टीव्ही देऊन ग्राहक एलईडी टीव्ही खरेदी करीत आहेत. हेच जुने सेकंड हँड एलसीडी टीव्ही रविवारच्या बाजारात विक्रीसाठी आणले जात आहेत. आता फ्लॅट टीव्ही हळूहळू आठवडी बाजारातून गायब होत असून, त्यांची जागा एलसीडी टीव्हीने घेतली आहे.