शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

घाटीचा कारभार ‘प्रभारी’

By admin | Updated: August 11, 2015 00:52 IST

औरंगाबाद : घाटीचा कारभार आठ महिन्यांपासून प्रभारी अधिष्ठातांकडे आहे. आठ महिन्यांत चार प्रभारी अधिष्ठातांनी घाटीचे कामकाज पाहिले.

औरंगाबाद : घाटीचा कारभार आठ महिन्यांपासून प्रभारी अधिष्ठातांकडे आहे. आठ महिन्यांत चार प्रभारी अधिष्ठातांनी घाटीचे कामकाज पाहिले. प्रभारी पदभारामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यास अडचणी येत असल्याने पूर्णवेळ अधिष्ठाता कधी मिळणार, याकडे घाटीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे हे ३० नोव्हेंबर २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून घाटी रुग्णालयाचा कारभार प्रभारींवर सुरू आहे. डॉ. भोपळे यांच्या सेवानिवृत्तीनंतर डॉ. छाया दिवाण यांच्याकडे प्रभारी अधिष्ठातापद आले.१ डिसेंबर २०१४ ते १५ मे २०१५ या कालावधीदरम्यान त्यांनी कामकाज पाहिले. त्यानंतर डॉ. बी. एस. खैरे यांनी ४२ दिवस कारभार पाहिला. २७ जूनपासून डॉ. कानन येळीकर यांच्याकडे कार्यभार आला. मागील आठवड्यात डॉ. मोहन डोईबळे यांच्याकडे काही दिवसांसाठी प्रभारी अधिष्ठातापद आले. सोमवारपासून पुन्हा डॉ. कानन येळीकर यांच्याकडे कार्यभार आला.प्रभारींवर प्रभारीप्रभारींवर प्रभारी नियुक्त होत असल्याने घाटीतील कामकाजाचा वेगही काहीसा मंदावला आहे. फाईल्सचा निपटारा करण्यासाठी कार्यालयात लवकर हजर राहून उशिरापर्यंत काम करावे लागत आहे.प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांसह परिचारक, ब्रदर आणि अन्य रिक्त पदांमुळे कामाचा ताण आणि भार अन्य कर्मचाऱ्यांवर येत असून, त्याचा रुग्णसेवेवरही मोठा परिणाम होत आहे. ४घाटीतील सिटी स्कॅन मशीन तीन महिन्यांपासून बंद पडले आहे. ६५ स्लाईड असलेल्या या मशीनच्या दुरुस्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. वैद्यकीय संचालकांनी अचानक दिलेल्या भेटीत घाटी रुग्णालयात असलेली सुरक्षा व्यवस्था बदलण्याचे अधिकार अधिष्ठातांना असल्याचे सांगितले होते. अशा अनेक प्रश्नांचा निपटारा होण्याची प्रतीक्षा आहे.