शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
3
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
4
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
5
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
6
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
7
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
8
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
9
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
10
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
11
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
12
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
13
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
14
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
15
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
17
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
18
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
19
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
20
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांना अभय

By admin | Updated: November 7, 2014 00:52 IST

वाळूज महानगर : बजाजनगर या कामगार वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत चालले असून, अतिक्रमण हटविण्यास एमआयडीसी प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते.

वाळूज महानगर : बजाजनगर या कामगार वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत चालले असून, अतिक्रमण हटविण्यास एमआयडीसी प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. यामुळे अतिक्रमणधारकांना प्रशासन अभय देत असल्याची ओरड सुरू आहे.बजाजनगरची लोकसंख्या झपाट्याने वाढतच चालली असून, या भागातील मुख्य चौकात व रस्त्यावर अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. या वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिक व वाहनधारकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. येथील महाराणा प्रताप चौक, मोहटादेवी चौक, एफडीसी चौक, मीनाताई ठाकरे मार्केट, मोरे चौक, लोकमान्य चौक, वडगाव रोड, कोलगेट चौक आदी ठिकाणी विविध व्यावसायिकांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. या मुख्य चौकात अतिक्रमण वाढल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारक, नागरिक, विद्यार्थी व कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची सतत कोंडी होत असून, अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मुख्य रस्ते व चौकच नव्हे तर अतिक्रमणधारकांनी फुटपाथचाही कब्जा घेतल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना चांगलीच कसरत करावी लागत आहेत. पूर्वी एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी एमआयडीसीच्या वतीने सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते. आता सुरक्षारक्षक गायब झाल्यामुळे अतिक्रमणांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रणधारकही निर्धास्त झाले आहेत. या वाढत्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याऐवजी एमआयडीसी प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. बजाजनगरात अतिक्रमणधारकांना एमआयडीसीचे अधिकारी पाठीशी घालत असल्यामुळे अतिक्रमणांमध्ये वाढ होत चालली आहे. आरक्षित भूखंड, हरित पट्टे व मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. अतिक्रमणधारकांकडून ‘मलई’ मिळत असल्यामुळे या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यास एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.