शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

तडीपारीच्या प्रस्तावावर अंमलबजावणी होईना !

By admin | Updated: September 1, 2016 01:15 IST

राजकुमार जोंधळे , लातूर जिल्हा पोलिस दलातील २३ पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने ७४ तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहेत

राजकुमार जोंधळे , लातूरजिल्हा पोलिस दलातील २३ पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने ७४ तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहेत. यंदा ७४ पैकी ९ जणांवर आतापर्यंत तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.जिल्हा पोलिस दलातील चाकूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा आणि लातूर ग्रामीण आणि लातूर शहर उपविभागाअंतर्गत येणाऱ्या २३ पोलिस ठाण्यांच्या स्टेशन डायरीवर सराईत आणि अट्टल गुन्हेगारांचे रेकॉर्ड संकलित करुन त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने महसूल प्रशासनाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहेत. आतापर्यंत ७४ प्रस्ताव या उपविभागातून दाखल करण्यात आली आहेत. त्यापैकी केवळ ९ प्रस्तावावर सुनावणी झाली असून, त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित ६५ प्रस्तावांची सुनावणी सुरु असून, गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला तरी, अंमलबजावणी झाली नाही, हे विशेष़विविध पोलिस ठाण्यांच्या क्राईम डायरीवर असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्याबाबत प्रस्ताव दाखल केले जातात. मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर या प्रस्तावांची सुनावणी होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी तडीपारीच्या कारवाईचा निर्णय घेतात. याबाबत पोलिस प्रशासानाच्या हाती केवळ अशा गुन्हेगारांचे रेकार्ड संकलित करुन ते उपविभागीय अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी पाठविणे एवढेच असते. असे अपर पोलिस अधीक्षक लता फड यांनी सांगितले.रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांच्या तडीपारीसाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने २०१६ मध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी ५५ प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत. तर २०१६ मध्ये ७४ पैकी ९ प्रस्ताव निकाली काढण्यात आल्यामुळे ६५ तडीपारीचे प्रस्ताव पडून आहेत. गेल्या दोन वर्षापासून तब्बल १२० प्रस्तावर तडीपारीची अंमलबजावणी न झाल्यामुळे अद्यापही लटकले आहेत.