शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

तुमच्यात धमक असेल तर पाणी देऊन दाखवा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 19:14 IST

उद्धवसेनेचे मिथुन व्यास आणि सहकारी २५ शेळ्यांसह मोर्चात सहभागी होते. त्यांनी प्रत्येक शेळीच्या गळ्यात ‘लबाडांनो, पाणी द्या’ अशी पाटी लटकावली होती.

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरवासीयांना तीन महिन्यांत पाणी देऊ, असे तुम्ही ओरडून सांगत होता. नुसते ओरडून चालत नाही, तर काम करावे लागते, तुमच्यात धमक असेल तर पाणी देऊन दाखवा, असे खुले आव्हान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथे एका जाहीर सभेत दिले.

शहराच्या पाणीप्रश्नांवर उद्धवसेनेच्या वतीने एक महिन्यापासून ‘लबाडांनो, पाणी द्या’ हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनांतर्गत शुक्रवारी सायंकाळी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक ते गुलमंडी असा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या समारोपप्रसंगी गुलमंडी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर सेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, सेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आदित्य म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण घनकचरा व्यवस्थापन किंवा एसटीपी प्रकल्प, सीबीसी शाळा आणि रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये दिले. या शहरासाठी अनेक योजना आणल्या. लाडकी बहीण योजनेचे २१०० रु. मिळाले का, असा सवाल त्यांनी उपस्थित महिलांना केला. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत, कर्जमाफीची घोषणा आता अजितदादांना आठवत नाही. या शहराला केवळ उद्धवसेनाच पाणी देऊ शकते, असे ते म्हणाले. तत्पूर्वी खैरे, दानवे आणि ज्योती ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजपवर टीका केली. मोर्चानंतर आदित्य ठाकरे, खैरे व आ. दानवे यांनी महापालिकेत जाऊन शहराच्या पाणीप्रश्नावर प्रशासक जी. श्रीकांत यांना निवेदन दिले.

‘लबाडांनो, पाणी द्या’ घोषणेने दणाणला मार्गक्रांती चौकापासून काढलेल्या मोर्चात अग्रभागी महिला हातात रिकामे हंडे घेऊन सहभागी झाल्या होत्या. गळ्यात भगवा रुमाल, हातात भगवा झेंडा घेतलेले आंदोलक घोषणा देत होते. क्रांती चौकापासून गुलमंडीपर्यंत आदित्य पायी चालत गेले. खैरे यांच्या पायाला दुखापत असल्याने ते एका खुल्या वाहनातून मोर्चास्थळी आले.

शेळ्यांच्या गळ्यात लटकावल्या पाट्याउद्धवसेनेचे मिथुन व्यास आणि सहकारी २५ शेळ्यांसह मोर्चात सहभागी होते. त्यांनी प्रत्येक शेळीच्या गळ्यात ‘लबाडांनो, पाणी द्या’ अशी पाटी लटकावली होती. एक आंदोलक संपूर्ण अंगाला फोम लावून विना कपड्याचा सहभागी होता. त्याच्या एका हातात ‘आंघोळीला पाणी द्या’ असा फलक होता. मोर्चाच्या प्रारंभी क्रांती चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि सह्यांची मोहीम राबविण्यात आली. आदित्य ठाकरे यांनी यात सहभाग नाेंदविला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAditya Thackreyआदित्य ठाकरेAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका