मला सांगितले तर राजकारणात येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:08 AM2018-02-19T00:08:35+5:302018-02-19T00:08:45+5:30

मला राजकारणात येण्यास सांगितले तर मी येईल. विद्यार्थिदशेपासून राजकारणात होते. मी अनेक नेते देशासाठी, समाजासाठी घडविले. देशासाठी जे आवश्यक असेल ते कार्य मी करणार असल्याचे सांगून त्यांनी आगामी काळात राजकारणात येण्याचे संकेतच दिले.

If I told you to come in politics | मला सांगितले तर राजकारणात येईल

मला सांगितले तर राजकारणात येईल

googlenewsNext
ठळक मुद्देसाध्वी प्रज्ञासिंह : तोगडियांबाबत माहिती नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मला राजकारणात येण्यास सांगितले तर मी येईल. विद्यार्थिदशेपासून राजकारणात होते. मी अनेक नेते देशासाठी, समाजासाठी घडविले. देशासाठी जे आवश्यक असेल ते कार्य मी करणार असल्याचे सांगून त्यांनी आगामी काळात राजकारणात येण्याचे संकेतच दिले.
कै. जनूभाऊ रानडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने ‘भगवा रंग त्यागाचा रंग’ या विषयावर साध्वी प्रज्ञासिंह यांचे सिडको नाट्यगृह एन-५ येथे १९ फेबु्रवारी रोजी सकाळी ११ वा. व्याख्यान होणार आहे. यानिमित्ताने त्या शहरात आल्या असून, नितीन अग्रवाल यांच्या निवासस्थानी त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विहिंपचे देवगिरी प्रांताध्यक्ष संजय बारगजे, राजेंद्र जहागीरदार, शिवाजी शेरकर, हेमंत त्रिवेदी आदींची उपस्थिती होती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून मुक्त झाल्यानंतर त्या प्रथमच औरंगाबाद शहरात आल्या आहेत. बंगळुरूला जाण्यासाठी या मार्गाने जाणार असल्यामुळे व्याख्यान करून जात असल्याचे त्या म्हणाल्या.
भगवा दहशतवाद असल्याचे बोलले जात आहे, यावर साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या, हो भगवा दहशतवाद आहे; पण अधर्मीयांसाठी आहे. भगव्या रंगाला दहशतवादी समजणे ही मानसिकता आहे. देशात सध्या शांततापूर्ण वातावरण राहिलेले नाही. यावर त्यांनी कालपर्यंत अशांती असल्याची टीका केली.
हिंदुत्वासाठी काम करणारे नेते प्रवीण तोगडिया यांना पत्रकार परिषदेत रडावे लागते. तुमच्याकडे दुर्लक्ष झाले. यावर त्या म्हणाल्या, तोगडिया यांच्याबाबतीत काय घडले हे मला माहिती नाही.
तुरुंगात ‘टॉर्चर’ केले; पुस्तक लिहिणार
मला तुरुंगात खूप ‘टॉर्चर’ केले गेले. त्यामुळे हाडांचा आजार झाला आहे. मणक्यांच्या उपचारासाठी बंगळुरूला जावे लागते. कॅन्सर व अन्य एका आजाराचे आॅपरेशन अलीकडच्या काळात झाले आहे. गळाल्यादेखील वारंवार इन्फेक्शन होत आहे. सार्वजनिक वातावरणाशी एकरूप झाल्यानंतर तुरुंगात जो त्रास झाला, त्यावर पुस्तक लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: If I told you to come in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.