छत्रपती संभाजीनगर: माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी झालेल्या दसरा मेळाव्यात मराठा आरक्षणावर बोलत त्यांना ओबीसीमधून नव्हे तर वेगळे आरक्षण द्या अशी मागणी केली होती. यामुळे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख करीत ते म्हणाले, तुला क्लिअर सांगतो. शहाणपणा करू नको, मी दादा (अजित पवार) मोजत नसतो. माझ्या नादी लागला तर तुझ्यासह अजित पवार यांचाही राजकीय करिअरचा देव्हारा करीन, असा थेट इशाराच जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळी येथे दिला.
प्रकृती खालावल्यामुळे शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकारने उभे राहणं गरजेचे आहे. मात्र केवळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत देऊन काय होणार आहे, त्यांची जनावरे मेली, त्यांच्या जमिनी खरवडून निघाली आणि घरादारात पाणी शिरल्याने सर्वस्व गेले आहे. अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा उभं राहता येईल अशी मदत दिवाळीपूर्वी द्यावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा शेती विचारवंताशी बोलून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठं राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला. एकाही मंत्र्याला राज्यात फिरता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/2263014444119703/}}}}
तीन समाजाचे स्वार्थी नेते मराठाद्वेषीमाळी, धनगर व वंजारी समाजाचे नेते स्वार्थी राजकारणापोटी मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. मात्र हे नेते म्हणजे त्यांचा संपूर्ण समाज होत नाही. परिमाणी आज गावांत मराठा आणि ओबीसी समाजात कोणतेही वाद नसल्याचे जरांगे यांनी सांगितले.
नोंदीची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीत लावाआजपर्यंत ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांची यादीच ग्रामपंचायतीत लावावी, मराठा आरक्षण आंदोलकांवरील सर्व गुन्हे तातडीने परत घ्यावी, हैदराबाद गॅझेटिअरट प्रमाणे अर्ज स्वीकारुन प्रमाणपत्र द्यायला सांगा,अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
Web Summary : Manoj Jarange Patil warns Dhananjay Munde against opposing Maratha reservation. He demands immediate farmer aid, threatens state-wide protests, and urges the government to provide reservation certificates based on available records.
Web Summary : मनोज जरांगे पाटिल ने मराठा आरक्षण का विरोध करने पर धनंजय मुंडे को चेतावनी दी। उन्होंने तत्काल किसान सहायता की मांग की, राज्यव्यापी विरोध प्रदर्शनों की धमकी दी और सरकार से उपलब्ध रिकॉर्ड के आधार पर आरक्षण प्रमाण पत्र प्रदान करने का आग्रह किया।