शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तीकारांची रात्रशाळा

By admin | Updated: August 18, 2014 01:01 IST

बाळासाहेब जाधव , लातूर गणपती बाप्पांच्या स्थापनेचा कालावधी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही दुष्काळसदृश परिस्थितीत मूर्तीच्या बुकिंगमध्ये यावर्षी वाढ झाली नाही़़ प

बाळासाहेब जाधव , लातूरगणपती बाप्पांच्या स्थापनेचा कालावधी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही दुष्काळसदृश परिस्थितीत मूर्तीच्या बुकिंगमध्ये यावर्षी वाढ झाली नाही़़ परंतु, गणेशमूर्तीच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालांच्या किंमतीत २० ते २६ टक्क्यांची वाढ झाली आहे़ काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या उत्सवासाठी गणेशमूर्तीवर रंगरंगोटीचे काम रात्रं-दिवस सुरू आहे. यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मागणीत फारशी वाढ नसली, तरी काम मात्र प्रगतीपथावर सुरू असल्याचे मूर्तीकार उमेश सोनवळकर यांनी सांगितले.वडिलोपार्जित व्यवसाय मूर्ती बनविण्याचा असल्याने त्यांच्या पावलावर पाऊल टाकत गेल्या ३२ वर्षांपासून उमेश सोनवळकर हे गणेशमूर्ती निर्मितीचा व्यवसाय करीत आहेत़ जुलै महिन्यात त्यांनी राजस्थान येथून २५ टन जिप्सम पावडर व तामिळनाडू जवळील सेलम येथून ४५ किलो केसर डाय रबर बनविण्यासाठी २५० लिटर डाय मॉडेल मागविले आहे. या कच्च्या साहित्याच्या आधारे मूर्ती बनविण्याचे काम प्रगतीपथावर सुरू केले़ यामध्ये त्यांनी २ फुटांच्या १५० गणेशमूर्ती, ३ फुटांच्या १५० मूर्ती तर ६ ते १० फुटांच्या ५० गणेशमूर्तीची निर्मिती केली़ परंतु, पावसाअभावी गणेश स्थापनेचा कालावधी १२ दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही ग्राहकांची मात्र वर्दळ कमीच आहे. त्यामुळे गणेशमूर्तीच्या व्यवसायास यावर्षी फटका बसतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़गणेशमूर्ती निर्मिती करणाऱ्या मूर्तीकरांना हा व्यवसाय करण्यासाठी सहा महिन्यांपासूनच भांडवलाची गुंतवणूक करावी लागते़ परंतु, कच्च्या मालाच्या किंमतीत यावर्षी वाढ झाल्यामुळे व्यवसाय अडचणीत येतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ मूर्तीकार उमेश सोनवळकर यांनी मूर्ती निर्मितीच्या व्यवसायात रावसाहेब कांबळे, शिवाजी होडगिरे, बालाजी धावर, मंगेश तोडकर, बाबासाहेब कांबळे, नामदेव वहाळे या सहा तरूणांना तयार केले असून, त्यांनी केलेल्या मूर्ती निर्मितीतून २० जणांचा उदरनिर्वाह चालविला जात आहे़ परंतु, यावर्षी गणपती उत्सव बारा दिवसांवर येऊन ठेपला तरी ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याने मूर्तीकारात नाराजी दिसून येत आहे़डाय मॉडेलप्रमाणे नवीन डिझाईन लातुरात आल्या आहेत़ त्यामुळे मुंबई, पुणे येथे तयार करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या मोठ-मोठ्या गणेशमूर्ती आता लातुरात तयार केल्या जात आहेत. चिंचपोंगळी राजा व पेशवा गणपतीच्या आगळ्यावेगळ्या मूर्ती तयार करण्यात आल्या असून, यावर्षीच्या उत्सवात सदरील गणेशमूर्ती आकर्षण ठरणार आहेत़