शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःचे अर्धे यकृत देत यमाला हरवलं; आधुनिक सावित्रीने मृत्यूच्या दारातून पतीला परत आणलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:39 IST

आधुनिक युगातील सावित्रीनेही काळाच्या यमाला हरवून आपल्या पतीला मृत्यूच्या दारातून परत आणले.

- प्राची पाटील

छत्रपती संभाजीनगर : २१ वर्षांच्या सुखी संसारात आजारपणाचे अचानक वादळ आले. सगळे काही संपणार, अशी परिस्थिती. काळोख, निराशा आणि मृत्यूची छाया मनावर पडू लागली. या परिस्थितीत ती उभी राहिली. सगळ्यांचा विरोध झुगारून निर्धाराने ती म्हणाली, ‘मी माझ्या पतीला काहीही होऊ देणार नाही’. आपले अर्धे यकृत तिने पतीला देऊन चमत्कारिकरीत्या जीवनदान दिले. सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. पण, या आधुनिक युगातील सावित्रीनेही काळाच्या यमाला हरवून आपल्या पतीला मृत्यूच्या दारातून परत आणले. वट पौर्णिमेच्या औचित्याला साजेशी मीनल आणि श्रीकर कहाळेकर यांच्या सहजीवनाची कहाणी आहे.

मूळ नांदेडच्या, पण सध्या छत्रपती संभाजीनगरात एका प्रशिक्षणासाठी आलेल्या मीनल आणि श्रीकर कहाळेकर यांचे आयुष्यही चारचौघांप्रमाणे सुरू होते. श्रीकर हे शेतकरी. राजकीय क्षेत्रातही त्यांचा राबता. संसार वेलीवर मुलगा आणि मुलगी अशी दोन फुले फुललेली. दरम्यान, श्रीकर यांना कावीळ झाली. त्यातच वडिलांच्या निधनाने खचल्याने त्यांना मद्य सेवनाचे व्यसन लागले. श्रीकर यांचे यकृत निकामी झाले. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले, ‘तत्काळ यकृत प्रत्यारोपण न केल्यास आयुष्य केवळ ४ ते ५ महिन्यांचे उरेल.’ पण, ऐनवेळेस कोणीही दाता मिळत नसल्याने अशा वेळी मीनल स्वतःहून पुढे आल्या.

टोकाचा विरोधमीनल कहाळेकर यांनी निर्णय घेतला, की मी स्वत: पतीला यकृत देणार. संपूर्ण कुटुंबाचा, नवऱ्याचाही टोकाचा विरोध झाला. ‘श्रीकर वाचेलच, याची खात्री नाही. तुलाही काही झाले तर मुलांनी कोणाकडे पाहायचे?’, असे म्हणत घरच्यांनी विरोध केला. पण त्या ठाम होत्या.

यमाच्या पाशातून सोडवले१०० हून अधिक तपासण्या, पोलिस व्हेरिफिकेशन, कागदपत्रांची पूर्तता यानंतर अखेर प्रत्यारोपणाची वेळ आली. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ६ ऑक्टोबर २०२४ला मीनल यांच्या १,४५० ग्रॅम यकृतातून ७५० ग्रॅम यकृत श्रीकर यांच्यात प्रत्यारोपित करण्यात आले. ऑपरेशननंतर काही आठवड्यातच आश्चर्यकारक सुधारणा दिसली. दोघेही आता पूर्णपणे ठणठणीत आहेत. हे केवळ वैद्यकीय यश नाही, तर इच्छाशक्ती, प्रेम, नि:स्सीम समर्पणाचे उदाहरण आहे.

कर्तव्य, प्रेम आणि पश्चात्तापमीनल म्हणतात, ‘प्रेम तर होतंच, पण कर्तव्य अधिक मोठे होते. माझ्या मुलांना त्यांच्या वडिलांचे प्रेम मिळावे, लेकीचे कन्यादान त्यांनीच करावे, हीच माझी इच्छा होती. त्यांनी काही चुका केल्या, पण त्या जाणूनबुजून नव्हत्या. त्या चुका स्वीकारून त्यांनी पश्चात्ताप केला. मी निर्णय घेतला नसता, तर आयुष्यभर अपराधीपणाची भावना मनात राहिली असती’.

तिने माझ्यासाठी काय केले, हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. पत्नी मीनलमुळे मला दुसरे आयुष्य मिळाले. तिचे स्थान माझ्या आयुष्यात देवापेक्षा कमी नाही.- श्रीकर कहाळेकर

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरOrgan donationअवयव दानVat Purnimaवटपौर्णिमा