शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री व्हायची घाई नाही, मी पूर्ण समाधानी

By admin | Updated: July 5, 2014 01:02 IST

औरंगाबाद : मुख्यमंत्री व्हायची मला अजिबात घाई नाही. काँग्रेसमधील निर्णय प्रक्रिया मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे मी कधीही पळापळ करीत नाही.

औरंगाबाद : मुख्यमंत्री व्हायची मला अजिबात घाई नाही. काँग्रेसमधील निर्णय प्रक्रिया मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे मी कधीही पळापळ करीत नाही. आतापर्यंत मिळाले त्यात मी पूर्ण समाधानी आहे, असे कायम मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी आज येथे सांगितले. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी औरंगाबादेत पत्रकारांशी राजकीय विषयांवर संवाद साधला. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. याविषयी विचारले असता विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलून फरक पडणार नाही. उलट एकदिलाने काम करण्याची आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी कधी मिळणार या थेट प्रश्नावर पतंगराव कदम म्हणाले, मी सरकारमधला सिनिअर मोस्ट नेता आहे; पण आमच्या पक्षात मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष बदलाचे निर्णय इथे होत नसतात. आमच्या पक्षात केवळ दोन ओळींचा ठराव होतो आणि सर्व अधिकार हायकमांडला दिले जातात. मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही. आतापर्यंत खूप काही मिळाले आहे. छोट्या गावातून आलो असूनही आमदार झालो. गेली ३० वर्षे आमदार आहे. २० वर्षांपासून मंत्री आहे. एक मोठे विद्यापीठ सुरू केले. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये पूर्ण समाधानी आहे, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कितपत यशस्वी होऊ शकेल? या प्रश्नावर पतंगराव म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला. हा पराभव मान्य करावाच लागेल; पण निवडणुकीत जय पराजय होत असतात. मी इंदिराजींना बघितले आहे, आणीबाणीनंतर पराभव झाल्यावर त्या कराडला आल्या होत्या. तेव्हा त्यांच्यासोबत केवळ पाच लोक होते; पण काही वर्षांतच त्यांनी भरघोस यश मिळविले. त्या पुन्हा सत्तेत आल्या. मोदी लाट आता विरली आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागलो आहोत. अशोकराव राज्याचे नेतेआगामी विधानसभा निवडणुकीतील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भूमिकेविषयी विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. मात्र, अशोकराव हे मराठवाड्याचेच नव्हे तर राज्याचे नेते आहेत. त्यांच्यावर कोणती जबाबदारी राहील हे आत्ताच सांगता येत नाही. काँग्रेसमध्ये सर्व त्या- त्या वेळी ठरते. त्यामुळे सध्या त्याविषयी चर्चा करणे योग्य नाही.