जैतापूर एचएससी कॉपी प्रकरण: अखेर खाजगी शिक्षण संस्थेतील १८ शिक्षक-कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 18:33 IST2026-02-17T18:28:35+5:302026-02-17T18:33:06+5:30

या प्रकरणात जिल्हा परिषदेकडून तीन शिक्षकांचे पूर्वीच निलंबन;  एकूण २१ जण घरच्या वाटेवर!

HSC Exam Mass Copying case in front of CCTV at Jaitapur: Finally 18 teachers and employees of a private educational institution suspended in Chhatrapati Sambhajinagar | जैतापूर एचएससी कॉपी प्रकरण: अखेर खाजगी शिक्षण संस्थेतील १८ शिक्षक-कर्मचारी निलंबित

जैतापूर एचएससी कॉपी प्रकरण: अखेर खाजगी शिक्षण संस्थेतील १८ शिक्षक-कर्मचारी निलंबित

छत्रपती संभाजीनगर : बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील परीक्षा केंद्रात शिक्षकांच्या मदतीनेच विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केली होती. हा प्रकार माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी उघडकीस आणल्यानंतर २४ जणांच्या विरोधात देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील तीन शिक्षकांना निलंबित केले. मात्र, उर्वरित १८ शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या निलंबनासाठी खासगी संस्थेला आदेश दिले होते. त्या आदेशानुसार संस्थेने तत्काळ चौकशी करत १८ जणांच्या निलंबनाचे कार्यादेश सोमवारी काढण्यात आल्याचे लाठकर यांनी सांगितले.

जैतापूर येथील राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्या केंद्रावर नेमण्यात आलेल्या शिक्षक, कर्मचारी आणि बैठ्या पथकाच्या संमतीनेच सामूहिक काॅपी करण्यात आली होती. त्याविषयी सीसीटीव्ही फुटेज आणि अधिकृत अहवालांच्या आधारे सर्वच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशीअंती संबंधित परीक्षा केंद्रावर कर्तव्यावरील काही शिक्षक व सेवकांनी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सेवा नियमांनुसार निलंबनाची कारवाई केल्याचे लाठकर म्हणाल्या.

खासगी शाळेतील निलंबितांची यादी
खासगी शाळेतील निलंबितांमध्ये भगवान निर्मळ, सचिन सातदिवे, नरेश सोनवणे, छाया मुंगे, बळीराम राठोड, आर. के. डरे, संतोष लिहिणार, अनंता गाढेकर, करणसिंग चंदवाडे, दीपक सोनवणे, बाळकृष्ण साळवे, संजय कडवे, संतोष भिंगारे, संजय दाभाडे, पी. सी. आव्हाळे, ऋषिकेश पाटील, राधा पेरे आणि सेवक एस. टी. घुगे यांचा समावेश आहे. यापूर्वीच जि.प.च्या आस्थापनेवरील तीन शिक्षकांना निलंबित केले. त्यामुळे निलंबितांची संख्या २१ वर गेली आहे.

सेवाशर्ती नियमांनुसार कारवाई
परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णवेळ कार्यान्वित असणे बंधनकारक आहे. परीक्षा कालावधीत होणाऱ्या सर्व घडामोडी सातत्याने रेकॉर्डिंग होणे अत्यावश्यक असून, संबंधित फुटेज सुरक्षित जतन करणे ही केंद्र संचालकांची जबाबदारी आहे. परीक्षा संपताच हे सीसीटीव्ही फुटेज माध्यमिक शिक्षण विभागाकडे जमा करावे लागणार आहे. कोठेही सीसीटीव्हीसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर सेवाशर्ती नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
-अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी

Web Title : जैतापुर एचएससी कॉपी मामला: निजी स्कूल के 18 शिक्षक निलंबित

Web Summary : जैतापुर परीक्षा केंद्र पर सामूहिक नकल के बाद निजी स्कूल के 18 शिक्षकों और कर्मचारियों को निलंबित कर दिया गया। जांच में परीक्षा नियमों के उल्लंघन की पुष्टि हुई। सीसीटीवी फुटेज से नकल का खुलासा हुआ, जिसके बाद शिक्षा अधिकारियों ने त्वरित कार्रवाई की।

Web Title : Jaitapur HSC Copy Case: 18 Teachers Suspended from Private School

Web Summary : Following mass copying at Jaitapur's exam center, 18 teachers and staff from a private school have been suspended after an investigation confirmed exam rule violations. CCTV footage revealed the cheating, leading to swift action by education officials.