‘ताजमहालाखाली शिवलिंग कसलं शोधता, कैलास मानसरोवरातील शिवलिंग मुक्त करा,’ संजय राऊतांनी भाजपाला डिवचले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 20:31 IST2022-06-08T20:30:24+5:302022-06-08T20:31:13+5:30

Sanjay Raut News: गेल्या काही दिवसांपासून देशात निर्माण होत असलेल्या मंदिर-मशीद वादावरूनही संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला. ताजमहालाखाली शिवलिंग कसलं शोधता, कैलास मानसरोवरातील शिवलिंग मुक्त करा, असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपाला दिले.

How to find Shivling under Taj Mahal, release Shivling in Kailas Mansarovar, 'Sanjay Raut urges BJP | ‘ताजमहालाखाली शिवलिंग कसलं शोधता, कैलास मानसरोवरातील शिवलिंग मुक्त करा,’ संजय राऊतांनी भाजपाला डिवचले 

‘ताजमहालाखाली शिवलिंग कसलं शोधता, कैलास मानसरोवरातील शिवलिंग मुक्त करा,’ संजय राऊतांनी भाजपाला डिवचले 

औरंगाबाद - औरंगाबादमध्ये शिवसेनेने आज आयोजित केलेल्या सभेमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. आजच्या सभेतून उठलेली लाट दिल्लीच्या तख्ताला हादरे दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून देशात निर्माण होत असलेल्या मंदिर-मशीद वादावरूनही संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला. ताजमहालाखाली शिवलिंग कसलं शोधता, कैलास मानसरोवरातील शिवलिंग मुक्त करा, असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपाला दिले.

संजय राऊत म्हणाले की, ही आंधी आहे तुफान आहे. ये दौर शुरू हो रहा है, ये उद्धव ठाकरे का दौर है. आज औरंगाबादमध्ये ही जनसागराची लाट उसळली आहे. ही लाट दिल्लीच्या तख्ताला हादरे देणारी लाट आहे. महाराष्ट्र आणि मराठवाडा कुणााचा आहे, हे सांगणारी ही सभा आहे. काही जणांनी याच ठिकाणी आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारा जन्माला यायचा आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

यावेळी संजय राऊत यांनी भाजपावरही जोरदार टीका केली. या मराठवाड्याने औरंजेबाला गाडला. निजामाचा पाडाव केला. आम्हीही निजामाच्या बापाच्या छातीवर पाय ठेवून सत्तेत आलो आहोत. आता पुढीव वर्षानुवर्षे आम्ही सत्तेत राहणार आहोत. ही गर्दी सांगतेय, आमच्या वाटेला जाऊ नका, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

काही दिवसांपूर्वी येथे कुणीतरी आक्रोष मोर्चा काढला. आक्रोष काय असतो तो काश्मिरी पंडितांना विचारा. तिथे गेल्या काही दिवसांत २७ काश्मिरी पंडितांची हत्या झाली आहे. काश्मिरी पंडित उद्धव ठाकरेंकडे आशेने पाहत आहे. ताजमहालाखाली शिवलिंग काय शोधताय. कैलाश मानसरोवरातील शिवलिंग चीनच्या ताब्यात आहे, हिंमत असेल तर ते मुक्त करा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. 

Web Title: How to find Shivling under Taj Mahal, release Shivling in Kailas Mansarovar, 'Sanjay Raut urges BJP