शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

पौरोहित्य करणाऱ्या तरुणाने स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी; घरात नशेच्या गोळ्या अन् चिठ्ठी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:39 IST

पौरोहित्य करणाऱ्या तरुणाच्या घरात ३३० नशेच्या गोळ्या आणि सुसाईड नोट; छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक घटना

 

छत्रपती संभाजीनगर: शहरातील एन-६, साईनगर भागात एका ३१ वर्षीय तरुणाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली होती. दरम्यान, घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. समीर नाईक असे या तरुणाचे नाव आहे. सिडको पोलिसांनी रविवारी समीरच्या घराची झाडाझडती घेतली असता, तिथे मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्या आणि दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

प्राथमिक तपासानुसार, समीर हा गेल्या काही काळापासून नशेच्या आहारी गेला होता आणि त्याच तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घराच्या झडतीत धक्कादायक वास्तव समोरसिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी समीरच्या खोलीची तपासणी केली असता, तिथे ३३० भांगसदृश (नशेच्या) गोळ्या आणि सुमारे १५० ते २०० रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. समीर हा नेहमी उज्जैन परिसरात जात असे, तिथूनच त्याने हा साठा आणल्याचा संशय आहे. याशिवाय रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे, ज्यात त्याने या कृत्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद केले आहे.

पौरोहित्य करणारा तरुण 'गावठी कट्ट्या'पर्यंत कसा पोहोचला?समीर हा आपल्या आई आणि भावासोबत भाड्याच्या घरात राहत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पौरोहित्य आणि आईचे बांगड्यांचे दुकान सांभाळत असे. शनिवारी सायंकाळी आई दुकानात गेल्यानंतर त्याने स्वतःच्या उजव्या कानाजवळ गावठी पिस्तूल लावून गोळी झाडली. गोळी डोक्याच्या आरपार गेल्याने त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. एका खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालय घाटी येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, समीरने हे पिस्तूल नेमके कोठून आणि कोणाकडून मिळवले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

धार्मिक ओढा आणि नशेचे जाळेसमीर हा महादेवाचा भक्त असून अनेकदा उज्जैनला जात असे. मात्र, एका बाजूला अध्यात्मिक ओढा आणि दुसऱ्या बाजूला नशेचे वाढते व्यसन यामुळे तो मानसिक तणावात असल्याची चर्चा परिसरात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून डायरी आणि इतर कागदपत्रे जप्त केली असून, त्याच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून अधिक तपास केला जात आहे. या घटनेमुळे उच्चभ्रू वस्ती असलेल्या एन-६ भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Priest Shoots Himself: Drugs, Suicide Note Found in Home

Web Summary : A 31-year-old priest in Sambhajinagar attempted suicide by shooting himself. Police found drugs, alcohol, and a suicide note stating no one is responsible. He is in critical condition. Investigation underway to find the source of the weapon.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDrugsअमली पदार्थ