शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

२०० हेक्टर्सवरील पिके आडवी

By admin | Updated: September 4, 2014 01:25 IST

डी़ ए क़ांबळे , हाळी हंडरगुळी चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे़

डी़ ए क़ांबळे , हाळी हंडरगुळी चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे़ विशेषत: नदीकाठच्या २०० हेक्टर्स क्षेत्रावरील पिके आडवी झाली आहे़ शिवाय, २० पेक्षा अधिक विहिरी गाळाने बुजल्या आहेत़ शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीही पाण्याखाली गेल्या़ मात्र अद्याप प्रशासनाकडून पंचनामे सुरु झाले नाहीत़ उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसराला शनिवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने झोडपले होते़ या पावसामुळे गावाशेजारुन वाहणाऱ्या तिरु नदीला मागच्या १४ वर्षांत कधी नव्हे तो इतका पूर आला़ नदीचे पाणी गावातील घरांघरांमध्ये शिरुन संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले़ काही घरांची पडझडही झाली़ गावातील नुकसानी प्रमाणेच नदीकाठच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले़ शेतात पाणी शिरल्याने पिके आडवी झाली़ हाळी हंडरगुळीसह परिसरातील शेळगाव, वडगाव, सुकणी, चिमाचीवाडी, मोर्तळवाडी, आनंदवाडी व इतरही काही शिवारातील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे़ साधारणत: २०० हेक्टर्सवरील सोयाबीन, ज्वारी, तूर, केळीचे नुकसान झाले़ अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा झाला आहे़ केवळ पिकाचेच नव्हे तर विहिरींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ नदीकाठच्या जवळपास २० पेक्षा अधिक विहिरी गाळात बुडून गेल्या आहेत़ तिरु नदी व प्रकल्पावर शेतकऱ्यांनी जोडलेल्या जवळपास १ हजाराहून अधिक विद्युत मोटारीही पाण्याखाली गायब झाल्या आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे़ ज्याप्रमाणे गावातील पडझड, नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात आले त्याप्रमाणे शेतीच्या नुकसानीचेही पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी शेतकरी सुनील कुंटे, खाजा तांबोळी, विकास जाधव, सतीश काळे, भाऊराव मुत्तलवाड यांच्यासह अनेकांनी केली आहे़ अतिवृष्टीने हाळी हंडरगुळी परिसरातील व तिरु नदीशेजारील शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याबाबत उपविभागीय अधिकारी विकास खरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्राथमिक अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला असल्याचे सांगितले़ कृषी विभागाकडून शेतीच्या नुकसानीबाबतची प्राथमिक माहिती या अहवालात आहे़ वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना मिळताच नुकसानीचे पंचनामे होतील, अशी माहितीही खरात यांनी दिली़