शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

‘हॉरिझन- २०२०’मुळे संशोधनाच्या मोठ्या संधी

By admin | Updated: October 11, 2014 00:39 IST

औरंगाबाद : ‘हॉरिझन- २०२०’ हा प्रकल्प राबविण्यात येणार असून तब्बल ८० बिलियन युरो इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

औरंगाबाद : युरोपियन युनियनच्या माध्यमातून पुढील सात वर्षांत संशोधन व नावीन्यपूर्ण प्रकल्प यासाठी ‘हॉरिझन- २०२०’ हा प्रकल्प राबविण्यात येणार असून तब्बल ८० बिलियन युरो इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे या प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणारे भारतातील पहिले विद्यापीठ असून आम्ही यासाठी सर्वतोपरी सहकार्यास तयार आहोत, अशी ग्वाही युरोपियन विद्यापीठाचे प्रतिनिधी डॉ. कार्लोस मचॅडो ब्रुसलेस बेल्जियम यांनी दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व युरोपियन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन व नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक गुरुवार, दि.९ रोजी महात्मा फुले सभागृहात घेण्यात आली. यावेळी डॉ. कार्लोस मचॅडो, प्रा. मारिया जेझस लामेला (स्पेन), प्रा. व्हेजी लॉरेंजो (इटली) व प्रा. मोजेस जोसेफ (पोलंड) हे प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. बी.ए. चोपडे, तर व्यासपीठावर कुलसचिव डॉ. धनराज माने, बीसीयूडी संचालक डॉ. के.व्ही. काळे, डॉ. अनिल कुऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनपर भाषणात डॉ. मचॅडो म्हणाले की, सन २०१४ ते २०२० या दरम्यान युरोपियन विद्यापीठाच्या वतीने ‘हॉरिझन- २०२०’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत सर्व देशांत लोकांचा आर्थिक स्तर उंचावला असून नोकरी, संशोधनाच्या नवनवीन संधी निर्माण झालेल्या आहेत. भारतासारख्या विकसनशील देशातील प्राध्यापकांनी याचा लाभ घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले. प्रारंभी, कुलगुरू डॉ. चोपडे यांनी बीजभाषण व व्हिजन प्लॅन सादर केला. इंडियन सायन्स काँग्रेसच्या सहकार्याने डिसेंबरमध्ये विद्यापीठात राष्ट्रीय परिषद होणार असून त्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ७७ मोठे प्रकल्प पूर्ण झाले असून विद्यापीठात १३३ प्रकल्प सुरू आहेत, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले.