छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक साफसफाई; दोन दिवसांत १३६४ मालमत्तांवर मनपाचा बुलडोझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 18:26 IST2025-06-30T18:26:04+5:302025-06-30T18:26:32+5:30

मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत १३६४ मालमत्तांवर कारवाई; महापालिका, पोलिसांची शहरात ऐतिहासिक कामगिरी

Historic cleanup in Chhatrapati Sambhaji Nagar; Municipal Corporation bulldozes 1364 properties from Mukundwadi to Cambridge | छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक साफसफाई; दोन दिवसांत १३६४ मालमत्तांवर मनपाचा बुलडोझर

छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक साफसफाई; दोन दिवसांत १३६४ मालमत्तांवर मनपाचा बुलडोझर

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ किरकोळ वादातून १९ जून रोजी एका तरुणाचा खून झाला. या एका कारणानंतर पेटून उठलेल्या पोलिसांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे २० जून रोजी महापालिकेला या भागातील तब्बल २२९ अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात पाडायला भाग पाडले. पोलिसांचे बळ मिळताच महापालिकेने मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत रस्ता २०० फूट रुंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवार आणि रविवारी दोन दिवसांत रस्त्याच्या दोन्ही बाजूची तब्बल ११३५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली.

शहर विकास आराखड्यानुसार महावीर चौक ते सेव्हन हिल या रस्त्याची रुंदी ४५ मीटर दर्शविण्यात आली आहे. सेव्हन हिल ते केम्ब्रिज चौकापर्यंत रस्ता ६० मीटर म्हणजे जवळपास २०० फूट आहे. विकास आराखड्यानुसार रस्त्याची अंमलबजावणी एवढ्या लवकर होईल, असे स्वप्नातही कोणाला वाटले नव्हते. खुनाच्या घटनेनंतर पोलिस आणि महापालिका प्रशासन अक्षरश: पेटून उठले. महापालिका प्रशासनाने जूनच्या पहिल्या आठवड्यात बीड बायपास रोडवर देवळाई ते महानुभाव आश्रमपर्यंत सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे काढली होती. टप्प्या-टप्प्याने उर्वरित रस्ते रुंद करण्याचा प्रशासनाचा विचार होता.

आज पैठण रोडवर कारवाई
मुकुंदवाडी येथील घटनेनंतर महापालिकेने युद्धपातळीवर पैठण रोडवर महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी मार्किंग केली. या भागातील बहुतांश मालमत्ताधारकांनी स्वत:हून आपले सामान काढून घेतले. मालमत्ताही काढून घेण्याचे काम केले. सोमवारी सकाळी ९:०० वाजेपासून मनपा आणि पोलिस संयुक्तरीत्या महानुभाव आश्रमपासून कारवाईला सुरुवात करणार आहेत.

पथक, कर्मचारी तेवढेच
पैठण रोडवर कारवाई करण्यासाठी ज्या पद्धतीने पथक तयार केले होते. तेच पथक सोमवारी पैठण रोडवर काम करतील. मनपाचे कर्मचारीही तेवढेच राहतील. पोलिस बंदोबस्तही तेवढाच राहणार असल्याचे मनपाकडून कळविण्यात आले.

Web Title: Historic cleanup in Chhatrapati Sambhaji Nagar; Municipal Corporation bulldozes 1364 properties from Mukundwadi to Cambridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.