छत्रपती संभाजीनगर शहरातील दाऊदपुरा भागातील नऊ एकर जमिनीच्या व्यवहारातून शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांचे वाहन चालक जावेद रसूल शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि धमकी दिल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
जबाबदारी फक्त आईचीच का? पितृत्व रजा कायदेशीर हक्क करा; राज्यसभेत राघव चड्ढांची मोठी मागणी
दाऊदपुरा परिसरातील नऊ एकर'हिबानामा' जमिनीच्या व्यवहारावरून हा सर्व वाद सुरू झाला. मुजाहिद इकबाल खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, या जमिनीच्या व्यवहारात त्यांचा विश्वासघात करून मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात जमिनीचे मूळ मालक मीर मेहमूद अली आणि खासदार भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख या दोघांनाही आरोपी करण्यात आले आहे.
मुजाहिद खान यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने दखल घेतली आहे. आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. जमिनीच्या व्यवहारात फसवणूक करणे. कायदेशीर प्रक्रियेत खोटी माहिती देऊन फसवणे.फिर्यादीला धमकावून दबाव तंत्राचा वापर करणे, या कलमाद्वारे गुन्हे दाखल केले आहेत.
गुन्हे शाखेकडून तपास सुरू
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाची चौकशी आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. खासदार संदिपान भुमरे यांच्या निकटवर्तीयावर हा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलीस आता या व्यवहारातील आर्थिक धागेदोरे तपासत असून, लवकरच काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
Web Summary : MP Sandipan Bhumre's driver, Javed Sheikh, is accused of fraud involving a nine-acre land deal in Daudpura. He faces charges of financial deception, breach of trust, and intimidation following a complaint. The crime branch is investigating the case, stirring political reactions.
Web Summary : सांसद संदीपन भुमरे के ड्राइवर जावेद शेख पर दाऊदपुरा में नौ एकड़ ज़मीन के सौदे में धोखाधड़ी का आरोप है। शिकायत के बाद उन पर वित्तीय धोखाधड़ी, विश्वासघात और धमकी देने के आरोप लगे हैं। अपराध शाखा मामले की जांच कर रही है, जिससे राजनीतिक प्रतिक्रियाएं हो रही हैं।