सिल्लोड तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी; पूर्णा-खेळणा नद्यांच्या पुराने ८ गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:46 IST2025-09-22T19:45:16+5:302025-09-22T19:46:31+5:30

अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत, वाहतूक ठप्प

Heavy rains again in Sillod taluka; 8 villages lost contact due to flooding of Purna-Khelna rivers | सिल्लोड तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी; पूर्णा-खेळणा नद्यांच्या पुराने ८ गावांचा संपर्क तुटला

सिल्लोड तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी; पूर्णा-खेळणा नद्यांच्या पुराने ८ गावांचा संपर्क तुटला

- श्यामकुमार पुरे
सिल्लोड:
रविवारी रात्री व सोमवारी पहाटे सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील आमठाना, गोळेगाव, अजिंठा मंडळात  पुन्हा अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पूर्णा व खेळणा या दोन मुख्य नद्यांना पुन्हा पूर येऊन रस्त्यावर पाणीच पाणी साचले. परिणामी रविवारी रात्रीपासून सोमवारी  सायंकाळपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प होऊन ८ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. 

मागील १० दिवसात सिल्लोड तालुक्यात तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाली आहे. यामुळे १७ गावातील शेतात उभी पिके नष्ट झाली आहेत. अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहे. कापूस मका सोयाबीन पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे.नदी काठावरील नागरिकांना याचा मोठा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या ८ गावांचा संपर्क तुटला
 
1) सावखेडा बु
2) सावखेडा खु
3) केळगाव 
4) घाटनांद्रा 
5) आमठाणा गावठाण हद्द 
6) बोरगाव वाडी 
7) बोरगाव सरवणी 
8) शिंदेफळ अंतर्गत वडारवाडी
या आठ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता.

ही आठ गावे पुराने बाधित
1) चारणेर 
2) देऊळगाव बाजार 
3) बोरगाव बाजार 
4) धावडा
5) चिंचवन 
7) हट्टी 
8) बहुली

ही आठ गावे पुराच्या पाण्याने बाधित झाली आहे. काही घरांमध्ये पाणी शिरले आहे.मात्र कुठेही जीवित हानी झाली नाही.
१)घाटनांद्रा येथील नवसा नाल्याला पूर आल्याने प्रशासनाने गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता 
नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला.
२) हट्टी अंतर्गत बहुली विरगाव  शिवारात जोरदार पाऊस झाला यामुळे रस्त्यावर अनेक छोट्या मोठ्या नद्यांना पूर आला होता.
३) शिंदेफळ येथे नाल्याला पुर आल्याने शिंदेफळ-वडारवस्ती रस्ता पाण्याखाली गेला होता यामुळे दिवसभर वाहतूक ठप्प झाली होती.
४)चारनेर ते घाटनांद्रा  गावाचा संपर्क तुटला होता.

सिल्लोड तालुक्यात मंडळ निहाय झालेला पाऊस
सिल्लोड २ मिलीमीटर, भराडी १५,अंभई १५,अजिंठा ६८,गोळेगाव ७१,आमठाणा ६७,निल्लोड ४५,बोरगाव बाजार २२ मिलीमीटर असा एकूण ३८ मिलीमीटर पाऊस झाला आहे

या रस्त्यावरील वाहतूक ठप्प
चारनेर - घाटनांद्रा, केळगाव, केळगाव घाट, सावखेडा खुर्द , सावखेडा बुद्रुक, धावडा-चिंचवन, हट्टी, बहुली या रस्त्यावरील वाहतूक पुराच्या पाण्यामुळे सोमवारी दिवसभर ठप्प होती.

Web Title: Heavy rains again in Sillod taluka; 8 villages lost contact due to flooding of Purna-Khelna rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.