सिल्लोड तालुक्यास वादळी वाऱ्यासह गारपीटीचा तडाखा; वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 20:05 IST2025-05-06T20:00:42+5:302025-05-06T20:05:04+5:30
सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकळी पावसाचा तडाखा

सिल्लोड तालुक्यास वादळी वाऱ्यासह गारपीटीचा तडाखा; वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: तालुक्यातील सिसारखेडा, उंडणगाव, घाटनांद्रा येथे आज सायंकाळी ५ वाजता वादळी वारा व गारपीटसह अवकाळी पाऊस झाला. तर सिसारखेडा वीज कोसळून शेतीची मशागत करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुनील गोविंदा चिरखे ( २५ वर्षे रा.सिसारखेडा) असे मृताचे नाव आहे.
सिल्लोड तालुक्यात उंडणगाव, घाटनांद्रा, सिसारखेडा येथे वादळी वारा व गारपीटसह अवकाळी पाऊस झाला. याशिवाय सिल्लोड तालुक्यातील भराडी, अंभई, पिंपळदरी, बाळापूर, गोळेगाव, केळगाव, अजिंठा, शिवना, सिल्लोड, पळशी, निल्लोड मंडळात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
सिल्लोड तालुक्यामध्ये चार वाजेपासून सोसाट्याचा वारा व ढगाळ वातावरण होते. त्यानंतर ठीक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड, अजिंठा, शिवना, या भागात वीज गुल झाली होती. दुरुस्तीची कामे महावितरणने वेळीच न केल्याने सिल्लोड शहरातील काही भाग अजिंठा, शिवना परिसरातील नागरिकांना सोमवारी रात्रभर आणि मंगळवारी दिवसभर विजेशिवाय रहावे लागले. उकाड्यामुळे नागरिकांचे हाल झाले.