दुचाकी घेऊन जाणाऱ्या कंटेनरला तिसगावजवळ भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:24 IST2019-04-03T16:24:12+5:302019-04-03T16:24:40+5:30

या घटनेत गाडीतील २५ ते ३० दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.  

A heavy fire to a container carrying a two wheelers near tisgaon | दुचाकी घेऊन जाणाऱ्या कंटेनरला तिसगावजवळ भीषण आग

दुचाकी घेऊन जाणाऱ्या कंटेनरला तिसगावजवळ भीषण आग

औरंगाबाद : हरिद्वार येथून कर्नाटक राज्यातील हसन येथे नवीन दुचाकी घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. मुंबई-नागपूर महामार्गावर तिसगावजवळ झालेल्या या घटनेत गाडीतील २५ ते ३० दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.  

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक राज्यातील हसन येथे हरिद्वार येथून ५० दुचाकी एक कंटेनर (एम एच 20, सिटी 9570) घेऊन जात होते. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावरील तिसगावजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कंटेनरने अचानक पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. यात मागच्या बाजूने ठेवलेल्या सुमारे २५ ते ३० दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमनदलाला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घ्त्नास्थाली धाव घेतली. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत कंटेनर आणि त्यातील दुचाकीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. यात कुठलीही जिवितहानी झाली नाही. 

Web Title: A heavy fire to a container carrying a two wheelers near tisgaon