शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य उपकेंद्र आजारी

By admin | Updated: August 19, 2014 02:10 IST

साहेबराव केंद्रे , माळहिप्परगा येथे सहा महिन्यांपूर्वी जवळपास १६ लाख रुपये खर्चुन आरोग्य उपकेंद्राची इमारत उभारण्यात आली़ कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून ही

साहेबराव केंद्रे , माळहिप्परगायेथे सहा महिन्यांपूर्वी जवळपास १६ लाख रुपये खर्चुन आरोग्य उपकेंद्राची इमारत उभारण्यात आली़ कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून ही इमारत कुलूपबंद आहे़ परिणामी खेड्यातील रूग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे़ ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळावी म्हणून शासनाच्या वतीने विविध योजना उपक्रमाद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत़ त्यासाठी लाखो रुपयांचा निधीही खर्च होत आहे़ परंतु, काही दुर्लक्षामुळे खेड्यातील रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे़ जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा हे ६ हजार लोकवस्तीचे गाव आहे़ या गावासह परिसरातील खेड्यामधील रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून आरोग्य उपकेंद्राची उभारणी करण्यात आली़ या उपकेंद्रास इमारत आवश्यक असल्यामुळे गेल्या सहा महिन्यापूर्वी १६ लाख रूपये खर्च करण्यात आले़ रंगरंगोटीसह अन्य कामे करण्यात आल्याने आरोग्य सेवा मिळेल, अशी अपेक्षा रूग्णांकडून व्यक्त केली जाऊ लागली़ सुरवातीचे दोन महिने आरोग्य सेवा मिळालीही़ परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे़ माळहिप्परग्याचे उपकेंद्र असल्याने याठिकाणी दोन परिचारिकांची सुरवातीस नियुक्ती झाली़ त्यानंतर एका परिचारिकेची बदली झाली़ सध्या एकाच परिचारकावर आरोग्य उपकेंद्राचा भार आहे़ परंतु, या परिचारकास जवळपासची चार गावे जोडून देण्यात आल्याने दररोज त्यास या गावांना भेटी देऊन पाहणी करावी लागत आहे़ माळहिप्परग्याच्या नव्या इमरतीत गरोदर महिलांना तपासण्यासाठी खोली, इतर रूग्णांना तपासण्यासाठी स्वतंत्र खोली यासह अन्य दोन खोल्या आहेत़ सुरुवातीस आरोग्य सेवा मिळू लागल्याने रूग्णांचा ओढाही वाढला होता़ आरोग्य केंद्राला कुलूप लागल्याने या भागातील रूग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे़ परिणामी खाजगी दवखान्याचा आधार घ्यावा लागत आहे़ उपकेंद्राची ही इमारत केवळ शोभेसाठीच असलेली पहावयास मिळत आहे़ इमारतीस कुलूप असल्याने काही विघ्नसंतोषींनी तिची नासधूसही केल्याचे पहावयास मिळत आहे़