शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

पर्यटनाच्या राजधानीचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:59 PM

शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, पसरलेली दुर्गंधी आणि माशांच्या वाढत्या उपद्रवामुळे अतिसारासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गॅस्ट्रोचे रोज ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत.

ठळक मुद्देगॅस्ट्रोचे आगमन : औरंगाबाद शहरात २५ हजार मेट्रिक टन कचरा सडतोय; वाढत्या दुर्गंधीमुळे नागरिकांचा संयम आता हळूहळू सुटू लागला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, पसरलेली दुर्गंधी आणि माशांच्या वाढत्या उपद्रवामुळे अतिसारासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गॅस्ट्रोचे रोज ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत.दुसरीकडे, घाटीत ‘आरएल’ यासारखी आवश्यक औषधी रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत असल्याचे चित्र आहे.दूषित पाण्याचा वापर व अनेक ठिकाणी कचरा तसाच पडलेला असल्याने याचाही नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. विविध ठिकाणी साचलेल्या कचºयावर डास, माशा बसतात. त्याच माशा उघड्यावर विक्री केल्या जाणाºया हातगाड्यावरील खाद्यपदार्थांवर बसतात. यातून संसर्ग होऊन हे अन्न दूषित होते. तसेच या गाड्यांवर काम करणाºया व्यक्तींचे हात स्वच्छ नसणे हेही एक कारण यामागे असून, या अन्नपदार्थांचे सेवन केल्यानेही गॅस्ट्रोची लागण होत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. तसेच काही ठिकाणी जलस्रोत दूषित होत आहेत. याचाही फटका नागरिकांना बसत आहे. दूषित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रोसारखा संसर्गजन्य आजार जडतो. जुलाब, उलटी होणे यातूनच रुग्णाला अशक्तपणा येतो. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मेडिसीन बिल्डिंगच्या वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गॅस्ट्रोची लागण झालेले ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत. त्यातच या वॉर्डामध्ये अत्यावश्यक असलेली औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत आहे.१६ फेबु्रवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. मागील पाच महिन्यांमध्ये शहरात जिकडे तिकडे २५ हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. कचरा प्रश्नावर महापालिकेने आतापर्यंत अनेक प्रयोग करून पाहिले. कोट्यवधी रुपये खर्च करूनही मनपाला यश आले नाही. कचराकोंडीमुळे शहरात पर्यटकांची संख्याही झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिका प्रशासन कचºयावर प्रक्रिया करणाºया मशीन खरेदी करण्यात मग्न आहे.गॅस्ट्रोची लागण होण्याची कारणे....दूषित अन्न, दूषित पाणी, माशा, अस्वच्छ हातांद्वारे या संसर्गजन्य आजाराची लागण होते. त्यामुळे उघड्यावरील अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे, तसेच बाहेरचे पाणी शक्यतो पिऊ नये, असा सल्ला डॉक्टारांनी दिला आहे.सध्या घाटी रुग्णालयात विविध औषधींचा तुटवडा आहे. औषधी खरेदीसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात ती मान्य झाल्यास औषधी उपलब्ध करून दिली जाईल.- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल