शहरं
Join us  
Trending Stories
1
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
2
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
3
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
4
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
5
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
6
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
7
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
8
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
9
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
10
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
12
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
13
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
14
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
15
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
16
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
17
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
18
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
19
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
20
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
Daily Top 2Weekly Top 5

‘सेबी’ च्या कचाट्यात एचबीएन अडकली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2015 00:30 IST

श्रीपाद सिमंतकर , उदगीर गुंतवणूकदारांना वेळेवर परतावा न दिल्याने एचबीएन कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे़


श्रीपाद सिमंतकर , उदगीर
गुंतवणूकदारांना वेळेवर परतावा न दिल्याने एचबीएन कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे़ त्यामुळे सेक्युरीटिज अ‍ॅन्ड एक्सचेंज बोर्ड आॅफ इंडीया (सेबी) च्या मुंबई शाखेने रिजर्व बँक आॅफ इंडीयाच्या निर्देशानुसार कार्यवाही केली़ यामध्ये एचबीएन कंपनीच्या संचालकांना चार वर्ष कंपनीचे व्यवहार थांबविण्यात यावे व गुंतवणूकदारांना त्वरीत परतावा द्यावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत़
एचबीएन डेअरीज अ‍ॅन्ड अलाईड लिमिटेड कंपनीचे संचालक हरमेंदर सिंग सरन, सतनाम सिंग सरन, अमनदिप सिंग सरन, गजराज सिंग चौहान, मंजीत कौर सरन, जसबीर कौर, राकेश कुमार तोमर, सुखदेव सिंग धिलौन व सुखजीत कौर यांना सेबी ने कंपनी संदर्भात सूचना केल्या़
१२ फेब्रुवारी २०१५ रोजी आदेश क्रमांकडब्लूटीएम/पीएस/७१/ सीआय एस-एनआरओ/ एफईबी/ २०१५ या सेबीने जारी केलेल्या आॅर्डर नुसार संचालकांनी ४ वर्षांकरीता कोणतीही योजना राबवू नये़ कोणत्याही योजनेअंतर्गत रक्कम गोळा करु नये़ तसेच ९ मार्च किंवा त्यापेक्षा १५ दिवसांमध्ये गुंतवणूकदारांच्या थकीत रकमा अदा कराव्यात, असे निर्देश दिले़ मात्र त्यानुसार कंपनीने आतापर्यंत कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही़
संबंधित विषयाची चौकशी करण्यासाठी सेबीच्या वेबसाईट व टोल फ्री नं़ १८००२२७५७५ या क्रमांकाशी संपर्क करुन सेबी आदेशाची खात्री करुन घेण्यात आली़ याठिकाणीही सेबीच्या आदेशासंदर्भात दुजोरा देण्यात आला़ अधिक माहितीसाठी मुंबई सेबी कार्यालयाशी संपर्क साधता येईल, असेही या माहितीत सांगण्यात आले़ एचबीएन कंपनीच्या दिल्ली मुख्यालयाशी त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी ०११-४९६९१२०० क्रमांकावर संपर्क केला असता दूरध्वनी संपर्क होऊ शकला नाही़