आरोग्यावर हजारी खर्च

By Admin | Updated: July 10, 2016 01:02 IST2016-07-10T00:44:55+5:302016-07-10T01:02:41+5:30

औरंगाबाद : शहरातील बहुतांश नागरिक हे महिन्यातून केवळ एक वेळ दवाखान्यात किंवा रुग्णालयात जाणारे असल्याचे ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Hazare expenditure on health | आरोग्यावर हजारी खर्च

आरोग्यावर हजारी खर्च

औरंगाबाद : शहरातील बहुतांश नागरिक हे महिन्यातून केवळ एक वेळ दवाखान्यात किंवा रुग्णालयात जाणारे असल्याचे ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. शहरातील आरोग्य सेवेचा दर्जा चांगला असे प्रमाणपत्र देत असतानाच तपासणी फी मात्र परवडत नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
‘शहरातील आरोग्य सेवेवर होणारा नागरिकांचा खर्च तसेच आरोग्य सेवेचा दर्जा’ याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात महिन्याकाठी केवळ एक वेळ जाणारे ३४ टक्के नागरिक आढळले. तर दोन महिन्यातून एक वेळ जाणारे ३२ टक्के नागरिक आढळले. डॉक्टरची फी, आरोग्य सेवेवर होणारा खर्च, डॉक्टरांनी रुग्णाला लिहून दिलेली औषधे परवडतात का, तसेच वैद्यकीय सेवेच्या दर्जाबाबत केलेल्या सर्वेक्षणात अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना महिन्याकाठी एकपेक्षा अधिक वेळ रुग्णालयात जाण्याचा प्रसंग येतो. उच्च उत्पन्न गटातील (सत्तर हजारांपेक्षा जास्त मासिक उत्पन्न) नागरिकांवर दोन महिन्यांतून एक वेळ रुग्णालयात जाण्याचा प्रसंग येत असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Hazare expenditure on health