शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अतिक्रमणांवर पुन्हा हातोडा

By admin | Updated: November 6, 2014 01:36 IST

बीड : शहरात वाढलेले अतिक्रमण हे अपघातास निमंत्रण देत होते, तसेच वाहतुकीसह अडथळा निर्माण करीत आहेत. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच

बीड : शहरात वाढलेले अतिक्रमण हे अपघातास निमंत्रण देत होते, तसेच वाहतुकीसह अडथळा निर्माण करीत आहेत. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला पत्र पाठवून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचे आदेश दिले. बुधवारी या मोहिमेला प्रत्यक्षात सुरूवातही झाली. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आला.शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह हातगाड्यावाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. अगोदरच रस्ते अरूंद असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत होती. तसेच अपघातालाही निमंत्रण मिळत होते. यापूर्वीही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. मात्र या मोहिमेनंतर अवघ्या काही दिवसात राष्ट्रीय महामार्गावर आणि शहरातील अंतर्गत मुख्य रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे थाटली. त्यामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत ‘राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अतिक्रमणे’ असे वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते. याची दखल घेत नवलकिशोर राम यांनी नगर परिषदेला मंगळवारी पत्र पाठवून अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बुधवारी बार्शी रोड, जालना रोड, शिवाजी पुतळा ते राजूरी वेस दरम्यानच्या अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आला. एकूण ८६ अतिक्रमणधारकांवर कारवाई केल्याचे स्वच्छता निरीक्षक सी.टी.तिडके यांनी सांगितले.यावेळी मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, स्वच्छता निरीक्षक युवराज कदम, रूपकर जोगदंड यांनी कारवाईत सहभाग घेतला. एक जेसीबी, ६ ट्रॅक्टर आणि ५० कर्मचाऱ्यांचा लवाजमा सोबत घेऊन बंदोबस्तात कारवाया करण्यात आल्या. (प्रतिनिधी)