सभागृहे बनली खुराडी!
By Admin | Updated: August 23, 2014 00:53 IST2014-08-23T00:51:59+5:302014-08-23T00:53:10+5:30
बीड संजय तिपाले / व्यंकटेश वैष्णव सांस्कृतिक चळवळ जिवंत रहावी, या उदात्त उद्देशाने शासनाने गावागावात सांस्कृतिक सभागृहे उभारली

सभागृहे बनली खुराडी!
बीड संजय तिपाले / व्यंकटेश वैष्णव
सांस्कृतिक चळवळ जिवंत रहावी, या उदात्त उद्देशाने शासनाने गावागावात सांस्कृतिक सभागृहे उभारली. पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे गावोगावी कोट्यवधी रुपये खर्च करुन सभागृहे तर झाली;पण या सभागृहांचा वापर अपेक्षेप्रमाणे होतो का? सांस्कृतिक चळवळींना बळ मिळाले का? हे ना प्रशासनाने तपासले ना राज्यकर्त्यांनी़ बहुतांश गावांतील सभागृहांचे अक्षरश: खुराड्यात रुपांतर झाले आहे. सभागृहांमधून सांस्कृतिक चळवळींपेक्षा भलत्याच ‘वळवळी’सुरु असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून पुढे आले. सभागृह म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी स्थिती आहे. जुगारी, दारुड्यांसाठी तर ही हक्काची आश्रयस्थाने बनली असल्याचा निराशाजनक निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आला.