शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

अन् निम्मे रुग्ण परतले !

By admin | Updated: May 29, 2014 01:12 IST

सिल्लोड : येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी घेण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात फक्त दोनच नेत्रतज्ज्ञ आल्याने निम्म्या रुग्णांवरच शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

सिल्लोड : येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी घेण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात फक्त दोनच नेत्रतज्ज्ञ आल्याने निम्म्या रुग्णांवरच शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे अर्ध्या रुग्णांना शस्त्रक्रि या न करताच आल्या पावली परत जावे लागले. मंगळवारी तालुक्यातील ६० रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रि येसाठी रुग्णालयात दाखल झाले होते; परंतु बुधवारी शस्त्रक्रि येच्या दिवशी दोनच नेत्रतज्ज्ञ सर्जन आल्याने हा प्रकार घडला. गेल्या महिन्यातही नेत्रतज्ज्ञ सर्जन न आल्याने रुग्णांना शस्त्रक्रि या न करताच परत जावे लागले होते. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नियमितपणे मोतीबिंदू शस्त्रक्रि या शिबीर घेण्यात येते. या शिबिरामध्ये प्रत्येक महिन्याला ९० ते १०० रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रि या केली जाते. मोतीबिंदूची परिपूर्ण वाढ झाल्यानंतरच रुग्णाला शस्त्रक्रि येसाठी दाखल करून घेतले जाते. मोतीबिंदूच्या अशा रुग्णांवर वेळेवर शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. वेळेवर शस्त्रक्रि या न झाल्यास रुग्णाला काचबिंदू होतो. ज्यामुळे नेत्र कायमस्वरूपी निकामी होऊन अंधत्व येते. मंगळवारी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रि येसाठी ६० रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी औरंगाबाद येथून प्रत्येक महिन्यात घेण्यात येणार्‍या शिबिराला ४ नेत्रतज्ज्ञ सर्जन येतात. परंतु बुधवारी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. सुनीता गोलाईत, डॉ.रूपा अंबेकर हे दोनच सर्जन आल्याने ६० रुग्णांपैकी ३४ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. २६ रुग्णांना शस्त्रक्रिया न करताच परतावे लागले. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर) महाराष्टÑात अव्वल तरीही... सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या सोयीसुविधा असल्याने जिल्ह्यासह जळगाव, बुलढाणा, जालना या बाहेरील जिल्ह्यांतील रुग्ण मोतीबिंदूची शस्त्रक्रि या करण्यासाठी येतात. दर महिन्यात ९० ते १०० तर वर्षभरात १०००ते ११०० रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते. राज्यात ५० बेड असलेल्या कुठल्याही रुग्णालयामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जात नाही. मोतीबिंदू शस्त्रक्रियेत सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय महाराष्ट्रात अव्वल आहे; पण गेल्या दोन महिन्यांपासून नेत्रतज्ज्ञ सर्जनअभावी रुग्णांना शस्त्रक्रिया न करताच परत जावे लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. एक सर्जन रजेवर, तर दुसरा आजारी शिबिरासाठी ४ सर्जन येत असतात. परंतु दोन महिन्यांपासून दोन सर्जन येत आहे. दोनपैकी एक सर्जन रजेवर असून एकाची प्रकृती बरी नसल्यामुळे ते आले नाही. यामुळे रुग्णांना परत जावे लागले. यापुढे रुग्णांना शस्त्रक्रिया न करता आल्या पावली परत जाण्याचा प्रकार घडणार नाही. यासाठी मी स्वत: याकडे गांभीर्याने लक्ष देईल. - डॉ.भूषणकुमार रामटेके, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय