परंडा : बंगळुरू शहरात चोरलेल्या सोन्याची खरेदी करणाऱ्या परंडा शहरातील एका व्यापाऱ्यास बेंगलोर पोलिसांनी रविवारी अटक केली़ त्याच्याकडून सोनं खरेदी करणाऱ्या इतर दोन व्यापाऱ्यांकडून अर्धा किलो ८९ ग्रॅम ३४० मिली सोनं जप्त करण्यात आले आहे़ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बंगळुरू (कर्नाटक) शहरात एका लक्झरी बसमधून प्रवास करणाऱ्या सोन्याच्या व्यापाऱ्याची तब्बल २ किलो, ८०० ग्रॅम सोन्याची बॅग चोरट्यांनी लंपास केली होती़ याबाबत अप्परपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ कर्नाटक पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून चोरट्यास अटक केली होती़ पोलिसी खाक्या दाखविताच चोरट्याने परंडा येथील शृंगार ज्वेलर्सचे मालक रहीम शेख यांना हे सोने विकल्याचे सांगितले़ बंगळुरू पोलिसांचे १२ जणांचे पथक चोरट्यासह एका खास लग्झरी बसमधून शुक्रवारी परंडा शहरात दाखल झाले़ परंडा पोलिसात याची रीतसर नोंद करण्यात आली़ पोलिसांनी दोन दिवस चौकशी करून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या रहीम शेख याच्या दुकानासह घरावर छापा मारला़ शेख याने चौकशीदरम्यान सोनं खरेदी केल्याचे कबूल करीत समर्थ ज्वेलर्सचे मालक पिंटू खर्डेकर, श्री ज्वेलर्सचे मालक अशोक लुंगटे यांना ते विकल्याचे सांगितले़ पोलिसांनी चोरीचा माल खरेदी केलेल्या खर्डेकर याच्याकडून २५४.३६० ग्रॅम सोने तर लंगुटे यांच्याकडून ३१४.९८० ग्रॅम चोरीचे सोने जप्त केले. या प्रकरणामध्ये रहीम शेख यास कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई संबंधित खुलासेवार लिखित प्रत परंडा पोलीस ठाण्यास दिली आहे़ दरम्यान, संपूर्ण तपास प्रक्रियेदरम्यान मुख्य चोराची ओळख व माहिती पोलिसांनी कोणालाच दिली नाही़ (वार्ताहर) उलट-सुलट चर्चेला उधाणचोरीचा माल तिन्ही सोने विक्रेत्याकडून हस्तगत करण्यात आला मात्र एकालाच अटक करण्यात आली. दोन व्यापाऱ्यांना मात्र सोडून देण्यात आले. त्या दोघांना पोलिसांनी सोडल्यानंतर शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे़ दहा व्यापाऱ्यांची चौकशीबंगळुरू येथील पथकाने सोने चोरी प्रकरणात येथील शहरातील १० सोने विक्रेत्यांना ताब्यात घेतले होते. यातील सात जणांची चौकशी करून सोडण्यात आले़ तर तिघांकडून सोनं जप्त करण्यात आले़सीसीटीव्हीमुळे तपासाला गतीज्या लग्झरी बसमधून सोनं चोरीस गेले त्या बसमध्ये सिसीटीव्ही कॅमेरे होते़ त्यातील फुटेज पाहिल्यानंतर अप्परपेठ पोलिसांच्या तपासाला गती आली़ संबंधित चोरास हुबळी (कर्नाटक) येथे केले असता ते चोर सालसा (ता. करमाळा) येथील असल्याचे समोर आले़कर्नाटकातील लोण परंड्यातकर्नाटक मध्ये सोन्याच्या चोरी प्रकरणाचे लोण परंडयापर्यत येऊन पोहोचले आहे़ त्यात एकास अटक करून दोघांकडून चोरीचे सोने जप्त करण्यात आले आहे़ बेंगलोर पोलिसांच्या या कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़
अर्धा किलो सोने जप्त
By admin | Updated: July 28, 2014 00:57 IST
परंडा : बंगळुरू शहरात चोरलेल्या सोन्याची खरेदी करणाऱ्या परंडा शहरातील एका व्यापाऱ्यास बेंगलोर पोलिसांनी रविवारी अटक केली़
अर्धा किलो सोने जप्त
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}