शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट अनुदान वाटप रोखले

By admin | Updated: June 9, 2014 01:14 IST

सेनगाव : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तहसील कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

सेनगाव : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तहसील कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. गारपीट अनुदान याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने तहसीलदारांनी पाच गावांमधील अनुदान वाटपाची प्रक्रियाच थांबविली आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने आर्थिक मदतीचे वाटप होत आहे. याकरिता सेगनाव येथील तहसील कार्यालयाला १२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, हे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. तालुक्यात बँक पातळीवर अनुदान वाटप प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गारपीट सर्वेक्षणाचे पितळ उघडे पडत आहे. येथील तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध गावातील शेतकऱ्यांनी तक्रार करून अनुदान वाटपातील गोंधळ समोर आणला आहे. बहुतांश गावातील अनुदान वाटप यादीत एका शेतकऱ्याला दोन वेळेस अनुदान देण्याचा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांनी गांभीर्याने नुकसानीचे पंचनामे केले नसल्याचा आरोपही सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून होत आहे. या गोंधळाची जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतल्यानंतर तहसीलदार आर. के. मेंडके यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी असलेल्या चोंढी बु., चोंढी खुर्द, ब्राम्हणवाडा, मन्नास पिंपरी, वलाना या पाच गावाचे अनुदान वाटप थांबविले आहे. चौकशी होईपर्यंत सदर अनुदान वाटप होणार नाही. चौकशीसाठी नायब तहसीलदारासह, मंडळ अधिकारी, तलाठी यांचे पथक गठीत करण्यात आले आहे. अनुदान वाटप यादीतील चुका दुरूस्त करून संबंधित गावात चावडीवाचनानंतर अनुदान वाटप करण्यात येणार आहे. या प्रकरणात तहसील कार्यालयाने कामचुकारपणा करणाऱ्या कोणत्याच तलाठी, कर्मचाऱ्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे हा प्रकार घडला. (वार्ताहर)पाच गावांमध्ये नाराजीसेनगाव तालुक्यातील गारपीट अनुदान याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने तहसीलदारांनी पाच गावांमधील अनुदान वाटपाची प्रक्रियाच थांबविली आहे.तहसील कार्यालयाला १२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले.हिंगोली जिल्ह्यात पाचही तालुक्यांमध्ये गारपिटीचे अनुदान वाटप जिल्हा बँकांमार्फत सुरू करण्यात आले आहे.सेनगाव तालुक्यात बँक पातळीवर अनुदान वाटप प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गारपीट सर्वेक्षणाचे पितळ उघडे पडत आहे. तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध गावांतील शेतकऱ्यांनी तक्रार करून अनुदान वाटपातील गोंधळ समोर आणला. बहुतांश गावांतील अनुदान वाटप यादीत एका शेतकऱ्याला दोन वेळेस अनुदान देण्याचा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.तहसीलच्या गोंंधळाचा पाच गावांतील शेतकऱ्यांना त्रास झाला आहे.