शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींच्या आपसी बदल्यांना मुहूर्त..!

By admin | Updated: May 31, 2016 23:27 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागातील गुरुजींच्या बदल्या तसेच समायोजनासाठी शासनाने ५ जूनपर्यंत कालावधी दिला होत.

उद्या जिल्हास्तरीय प्रक्रिया : तालुकास्तरीय बदल्या शनिवारीउस्मानाबाद : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागातील गुरुजींच्या बदल्या तसेच समायोजनासाठी शासनाने ५ जूनपर्यंत कालावधी दिला होत. सदरील वाढीव कालावधी सरण्यास अवघे चार ते पाच दिवस उरल्यामुळे उपरोक्त बदली प्रक्रिया होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. असे असतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने बदल्यांच्या तारखा मंगळवारी जाहीर केल्या. त्यानुसार जिल्हास्तरीय आपसी बदल्या २ जून रोजी तर तालुकास्तरीय प्रशासकीय व विनंती बदल्या ४ जून रोजी केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे पात्र गुरुजींचा जीव भांड््यात पडला आहे.प्राथमिक शिक्षण विभाग हा जिल्हा परिषदेतील सर्वाधिक कर्मचारी असणारा विभाग आहे. सुमारे पाच हजारावर अस्थापना आहे. त्यामुळे इतर विभागांच्या तुलनेत बदल्या तसेच समायोजनासाठीही अधिक कालावधी लागतो. १५ मे रोजी जिल्हास्तरीय विनंती बदल्या ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, ऐन बदल्यांच्या दिवशी ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. कारण सदरील प्रक्रिया राबविल्यानंतर भूम, परंडा आणि वाशी या तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त होत होत्या. बहुतांश गुरुजींनी उस्मानाबाद, तुळजापूर आणि त्यानंतर कळंबला पसंती दिली होती. त्यामुळे असमतोल निर्माण होवून शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी प्रधान सचिवांकडे उपरोक्त प्रक्रियेसाठी ५ जूनपर्यंत मुदत वाढवून मागिती होती. त्यानुसार प्रधान सचिवांनीही हिरवा कंदिल दिला होता. दरम्यान, जून महिना सुरू होवूनही आपसी तसेच तालुकास्तरीय विंनती आणि प्रशासकीय बदल्या होत नसल्याने पात्र गुरुजींमध्ये धाकधूक वाढली होती. मागील दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेत गुरुजींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता.जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सभापती, शिक्षणाधिकारी यांची भेट घेवून प्रक्रिया राबविण्याबाबत आग्रह धरला जात होता. त्यानुसार अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांनी जिल्हास्तरीय आपसी बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याबाबत सूचना केली होती. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी मंगळवारी शिक्षण विभागाला ही प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षण विभागाने बदल्यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जिल्हास्तरीय आपसी बदल्या २ जून रोजी तर तालुकास्तरीय विनंती आणि प्रशासकीय बदल्या ४ जून रोजी घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)७४ गुरुजींनी दाखल केले प्रस्तावजिल्हास्तरीय विनंती बदलीसाठी तब्बल सातशेवर प्रस्ताव आले होते. परंतु, अतिरिक्त गुरूजी आणि निमशिक्षकांमुळे या बदल्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे २ जून रोजी जिल्हास्तरावर केवळ आपसी बदल्या होणार आहेत. या बदल्यांसाठी जवळपास ७४ गुरूजींनी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. शिक्षण विभागाने बदल्यांच्या तारखा जाहीर केल्यामुळे उपरोक्त पात्र गुरूजींचा जीव भांड्यात पडला आहे.‘झेडपी’ : पात्र असणाऱ्या गुरुजींमध्ये समाधानाचे वातावरणजिल्हास्तरीय आपसी बदल्यांसाठी ७४ च्या आसपास शिक्षकांचे प्रस्ताव आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय प्रशासकीय आणि विनंती बदल्यांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सदरील बदली प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत, असे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.