रांजगणावात जुगार अड्ड्यावर छापा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 22:59 IST2019-05-19T22:59:29+5:302019-05-19T22:59:41+5:30
रांजणगाव येथे शनिवारी गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्डयावर छापा मारुन मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजगणावात जुगार अड्ड्यावर छापा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
वाळूज महानगर : रांजणगाव येथे शनिवारी गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्डयावर छापा मारुन मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती खबऱ्या मार्फत गुन्हे शाखेचे फौजदार अफरोज शेख यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे फौजदार शेख यांनी पथकासह जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी जुगाराचा खेळ सुरु असल्याचे दिसून आले. खात्री पटताच शेख यांनी छापा मारुन जुगार खेळणाºया सय्यद नबी (३२, रा. रांजणगाव), कृष्णा शिंदे (४२, रा. खोजेवाडी) व आनंद गोतवळे (२९, रा. रांजणगाव) या तिघांना पकडून त्यांच्या ताब्यातील जुगाराच्या साहित्यासह १४ हजार ४२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तिघांना वाळूज एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधिन करुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.