शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीसाठी प्रशासन झाले सज्ज

By admin | Updated: October 19, 2014 00:20 IST

जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघांमध्ये १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर आता रविवारी पाचही ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघांमध्ये १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर आता रविवारी पाचही ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी प्रक्रिया सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. जालना येथे औरंगाबाद रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात, भोकरदन येथे नगरपरिषद मंगल कार्यालय, बदनापूर येथे कृषी महाविद्यालय, घनसावंगी येथे तहसीलजवळील शासकीय गोदामात तर परतूर येथे जवाहर नवोदय विद्यालयात मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात परतूर येथे २३ तर अन्य चारही मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या २२ फेऱ्या होणार आहेत. सर्वप्रथम टपालाद्वारे आलेल्या मतपत्रिकांची मोजणी होईल.प्रत्येक टेबलवरील मतमोजणी व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी सी.सी.टिव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून याशिवाय प्रत्येक केंद्रात व्हिडीओ चित्रीकरण करणारे तीन फिरते पथकेही कार्यरत राहणार आहेत. मतमोजणी केंद्रात मोबाईलच्या वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. ज्या व्यक्तींकडे निवडणूक विभागामार्फत प्रवेशासाठी पास देण्यात आली, त्यांनी सोबत स्वत:चे ओळखपत्रही बाळगणे आवश्यक असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. निवडणूक कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे रंगीत तालिम जालना केंद्रावर निवडणूक निर्वाचन अधिकारी मंजुषा मुथा, भोकरदन केंद्रावर लक्ष्मीनारायण मिश्रा, बदनापूर केंद्रावर डॉ. भारत कदम, परतूर केंद्रावर अरविंद लोखंडे तर घनसावंगी केंद्रावर डॉ. श्रीमंत हारकळ यांनी दिले. सर्व मतदान केंद्रांवर मतमोजणीचा अंतिम निकाल दुपारी २ वाजेपर्यंत मिळणे अपेक्षित आहे. केंद्रात प्रवेशासाठी पोलिसांकडून होणार तीनवेळा तपासणीमतमोजणीच्या २२ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक टेबलवर तीन मतमोजणी कर्मचारी व त्यांच्या मदतीला एक शिपाई याप्रमाणे चार कर्मचारी असणार आहेत. प्रत्येक फेरीतील मोजणी अंदाजे २० मिनिटात संपणार आहे. प्रत्येक केंद्रावर २५० ते ३०० मतमोजणी कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. निवडणूक निर्वाचन अधिकारी, त्यांचे सर्व सहकारी, निवडणूक कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रात सभागृहाच्या आतील बाजूने प्रवेश असेल. तर उमेदवारांचे एजंट, पत्रकार यांना बाहेरील बाजूने प्रवेश राहिल. मात्र प्रत्येकास प्रवेश देताना पोलिसांमार्फत तीन ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. मतमोजणी केंद्राच्या आवारात कोणत्याही वाहनास (निवडणूक अधिकारी वगळता) प्रवेश राहणार नाही. मात्र केंद्राच्या बाहेरील बाजूने चंदनझिराकडे जाणाऱ्या मार्गावर तर अन्य केंद्रांवरही मतमोजणी परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर राज्य पोलिस कर्मचाऱ्यांसोबतच सेना सुरक्षा बलाचे ५० जवानांची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)मतमोजणीच्या पूर्वसंध्येला पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची रंगीत तालिम घेण्यात आली. निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांसह केंद्रीय निरीक्षकांची यावेळी उपस्थिती होती.विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीसाठी व्यवस्था, निकाल संकलनासाठी आवश्यक व्यवस्था, सर्व स्ट्राँगरूमवर देखरेख, संकलन आदी कामांची रंगीत तालीम घेण्यात आली.