शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तर उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी घेणार-पालकमंत्री

By admin | Updated: August 20, 2014 00:19 IST

नांदेड : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून २० दलघमी पाणी घेणार असल्याची माहिती पालकमंत्री डी़पी़सावंत यांनी दिली़

नांदेड : यंदा जिल्ह्यात फक्त १७ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे़ येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास पिण्यासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून २० दलघमी पाणी घेणार असल्याची माहिती पालकमंत्री डी़पी़सावंत यांनी दिली़विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला ११ दलघमी एवढा पाणीसाठा आहे़ हे पाणी आगामी तीन महिने पुरेल़ आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यास मात्र पाणीटंचाईची समस्या गंभीर होणार आहे़ विष्णूपुरीतून शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी देण्यात येते़ परंतु आगामी काळात पिण्यासाठी पाणी आणावे लागणार आहे़ उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील २० दलघमी पाणी नांदेडसाठी राखीव करण्यात आले आहे़ हे पाणी कालव्याद्वारे आसना नदीत आणून त्या ठिकाणी लिफ्ट करुन काबरानगर जलकुंभात आणता येईल़ परंतु सोडलेल्या २० दलघमी पाण्याऐवजी नांदेडपर्यंत फक्त १० ते १२ दलघमी एवढेच पाणी पोहचण्याची शक्यता आहे़ दुष्काळ घोषित करण्याच्या संदर्भाने सावंत म्हणाले, सध्या जिल्ह्यात ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत़ परंतु आणेवारी कमी आहे़ आणेवारीनंतरच दुष्काळ जाहीर करता येतो़ परंतु तोपर्यंत तहसिलदारांना टँकर सुरु करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत़ तसेच शेतसारा, शेतकऱ्यांच्या पाल्यांना शुल्क माफी आदींचा निर्णयही घेण्यात आला आहे़ येत्या काही दिवसात मराठवाड्यात चारा टंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे़ त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चारा छावण्या सुरु करण्याचा मुद्दा जोरकसपणे मांडण्यात येईल असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)