पालकमंत्र्यांनी दिली गंगामसला गावाला भेट

By Admin | Updated: September 4, 2015 00:18 IST2015-09-04T00:18:22+5:302015-09-04T00:18:22+5:30

गंगामसला : माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गुरूवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधला.

Guardian minister gave a visit to the village of Ganges | पालकमंत्र्यांनी दिली गंगामसला गावाला भेट

पालकमंत्र्यांनी दिली गंगामसला गावाला भेट

पालकमंत्र्यांनी दिली गंगामसला गावाला भेट
गंगामसला : माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गुरूवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधला.
यावेळी आ. आर. टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे देखील सोबत होते. याप्रसंगी पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावरून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. सर्वांनी हिंमतीने दुष्काळाचा सामना केला पाहिजे. आवश्यक तेथे छावण्या, पाणी, चारा उपलब्ध केला जात आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना सुरू आहेत. प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना यावेळी दिले. (वार्ताहर)

Web Title: Guardian minister gave a visit to the village of Ganges