शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

जीवनदाता बनण्याचा आलेख वाढता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:57 PM

रक्तदान म्हणजे जीवनदान. अपघात असो की मोठी शस्त्रक्रिया अथवा अन्य काही आजाराप्रसंगी रुग्णांना रक्त लागतेच. गेली अनेक वर्षे अज्ञान, गैरसमजुतीमुळे रक्तदानाचे प्रमाण अंत्यत कमी होते. मात्र, जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांत कोणतीही अपेक्षा न ठेवता रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. परिणामी, अनेकांचा जीव वाचत आहे.

ठळक मुद्देजागतिक रक्तदाता दिन : तरुणाई आघाडीवर, रक्तदानामुळे मिळतेय रुग्णांना जीवदान

संतोष हिरेमठऔरंगाबाद : रक्तदान म्हणजे जीवनदान. अपघात असो की मोठी शस्त्रक्रिया अथवा अन्य काही आजाराप्रसंगी रुग्णांना रक्त लागतेच. गेली अनेक वर्षे अज्ञान, गैरसमजुतीमुळे रक्तदानाचे प्रमाण अंत्यत कमी होते. मात्र, जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांत कोणतीही अपेक्षा न ठेवता रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. परिणामी, अनेकांचा जीव वाचत आहे.शहराची लोकसंख्या १३ लाखांवर गेली आहे. गोरगरिबांचे आधारवड म्हणून ओळखल्या जाणाºया घाटी रुग्णालयात दररोज मराठवाड्यासह लगतच्या भागातून उपचारासाठी रुग्ण दाखल होतात. शहरात खाजगी रुग्णालयांचेही जाळे मोठे आहे. येथेही उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उपचारादरम्यान अनेक रुग्णांना रक्ताची गरज असते. शहरात आजघडीला आठ रक्तपेढ्या आहेत. रक्तपेढ्यांमधून वर्षभरात ४५ ते ५० हजार बॅग रक्तसंकलन होते. शहरातील लोकसंख्येच्या काही टक्के रक्तदानाचे प्रमाण आहे. मात्र, त्यामध्ये दरवर्षी वाढ होत असल्याचे दिलासा देणारे चित्र आहे. रक्तदानाचे मूल्य ओळखून स्वेच्छा रक्तदानाविषयी समाजात जनजागृती वाढत आहे. त्यामुळे रक्तदान करणाºयांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये तरुणाई आघाडीवर आहे. शहरातील रक्तदात्यांपैकी ५० टक्के रक्तदाते हे वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करतात.पुणे-मुंबईला ज्या प्रमाणात स्वेच्छा रक्तदान होते, त्या तुलनेत शहरात रक्तदान होत नसल्याची ओरड केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत वाढदिवसाच्या दिवशी स्वत:हून रक्तदान करण्याकडे ओढा वाढत आहे. कोणताही गाजावाजा न करता रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले जाते. त्याबरोबर विविध संस्था, संघटनांकडून नियमितपणे रक्तदान शिबिरे घेतली जात आहेत. त्यामध्ये नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.रक्तदानाचे प्रमाण वाढत असले, तरी मे, जून महिन्यांत दरवर्षी रक्ताच्या तुटवड्याला सामोरे जावे लागते. गरजू रुग्णांसाठी रक्तदान करण्याचे आवाहन करण्याची वेळ रक्तपेढ्यांवर ओढावते. अशा वेळीही दाते रक्तदानासाठी धावून येतात. गोरगरीब रुग्णांसाठी घाटीतील विभाग रक्तपेढी महत्त्वाची भूमिका निभावत आहे. याठिकाणी दरवर्षी १५ हजारांवर दात्यांकडून रक्तदान केले जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तसंकलनासाठी डॉ. अनिल जोशी, डॉ. सुरेश गवई, डॉ. शुभज्योती पोरे, विभागीय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे, सुनीता बनकर आदींकडून प्रयत्न केले जातात.एका दात्यामुळे तीन रुग्णांना जीवदानप्रत्येक निरोगी माणसाच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. गरजेपेक्षा ५०० मि.लि. जास्तीचे रक्त यकृत आणि पाणथरीमध्ये साठविलेले असते. रक्तदानाच्या वेळी ३५० मि.लि. रक्त घेतले जाते. ते रक्त ४८ तासांत भरून निघते. लालरक्तपेशी, प्लेटलेट, रक्तातील द्रव भाग आदी वेगवेगळे केले जातात. त्यामुळे एका रक्तदात्यामुळे किमान तीन रुग्णांना फायदा होतो.नागरिकांत जागृतीरक्तदात्यांमध्ये वाढ होत आहे. १५ हजारांवर रक्त पिशव्यांचे दरवर्षी संकलन होते. मे आणि जूनचा पहिला, दुसºया आठवड्यातच फक्त रक्ताचा तुटवडा असतो. नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. सामाजिक संस्था रक्तदान शिबिरे घेतात. त्यातून रक्तदानाचे प्रमाण वाढत आहे.- डॉ. शुभज्योती पोरे, सहायक प्राध्यापक, विकृतीशास्त्र विभाग, घाटी२७ हजार दात्यांचे रक्तदानहळूहळू फरक पडत आहे. रक्तदानाचे दरवर्षी प्रमाण वाढत आहे. रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर त्याचे वेगवेगळे घटक केले जातात. त्याचा रुग्णांना मोठा फायदा होतो. रक्तपेढीत गेल्या वर्षी २७ हजार दात्यांनी रक्तदान केले. यावर्षी आतापर्यंत १२ हजार दात्यांनी रक्तदान केले आहे.- डॉ. मंजूषा कुलकर्णी, वैद्यकीय संचालक, दत्ताजी भाले रक्तपेढीघाटीतील विभागीय रक्तपेढीतील स्थितीवर्ष रक्तदाते२०१७ १४,४८२२०१८ १५,२४४२०१९ (१२ जूनपर्यंत) ६,७३०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य