शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाला अभिवादन

By admin | Updated: December 7, 2015 01:00 IST

बीड: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.

बीड: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ हजारोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.रविवारी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून धम्मरॅलीला प्रारंभ झाला. भारतीय बौद्ध महासभा व पंचशील नगरच्यावतीने रॅली काढण्यात आली होती. या दोन्ही रॅली कारंजा, धोंडीपुरा, माळीवेस मार्गे रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दाखल झाली. या ठिकाणी त्रिशरण पंचशील ग्रहण करीत सामुहीक बुद्ध वंदना झाली. ध्वजारोहन इंजि. बी.डी. साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर २२ प्रतिज्ञांची शपथ सदाशिव कांबळे यांनी दिली. यावेळी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी भगवान कांडेकर, अ‍ॅड. सुरेश वडमारे, सूर्यकांत जोगदंड, मच्छिंद्र डोंगरे, मनीषा तोकले, अशोक तांगडे, राहुल सवाई, कैलास वीर, अ‍ॅड. अविनाश गंडले, तत्वशील कांबळे, रवींद्र गोदाम, अ‍ॅड. सिद्धार्थ शिंदे, अनिल डोळसे, अभय मगरे, गंगाधर डिगांबरे, रेवती ओव्हाळ, शीला वाघमारे, आम्रपाली जाधव, अहिल्या गायकवाड यांच्यासह हजारो अनुयायांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)