ऑरिकमधील प्रस्तावित इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरला हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 04:52 PM2023-01-06T16:52:31+5:302023-01-06T16:53:38+5:30

ऑरिक सिटीच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये मसिआतर्फे आयोजित चारदिवसीय महा एक्स्पोचे उद्घाटन उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले.

Green Light to Proposed International Convention Center in Auric; Indirect announcement made by Industrial Minister Uday Samant | ऑरिकमधील प्रस्तावित इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरला हिरवा कंदील

ऑरिकमधील प्रस्तावित इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरला हिरवा कंदील

googlenewsNext

औरंगाबाद : ‘मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड ॲग्रिकल्चरल असोसिएशन’ने (मसिआ) महा एक्स्पो प्रदर्शन केवळ औरंगाबादेतच नव्हे, तर दोन वर्षे पुणे, कोकणात प्रदर्शने भरवावीत आणि तीन वर्षांनंतर होणारा महा एक्स्पो ऑरिक सिटीच्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअरमधील (डीएमआयसी) इंटरनॅशनल कव्हेंन्शन सेंटरमध्ये भरवावे, नमूद करून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ऑरिकमध्ये इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्याची अप्रत्यक्ष घोषणा केली.

ऑरिक सिटीच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये मसिआतर्फे आयोजित चारदिवसीय महा एक्स्पोचे उद्घाटन उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित नसले, तरी ते लघु उद्योजकांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य होतील. हे प्रदर्शन मराठवाड्याच्या बाहेर पण घ्या. मुंबई, पुणे नागपूर येथे देखील असे एक्स्पो व्हायला हवे.

मसिआतर्फे दर तीन वर्षांनंतर एक्स्पोचे आयोजन केले जाते. पुढील दोन वर्षे कोकण आणि पुण्यात महा एक्स्पो भरवावा. तिसरा एक्स्पो तुम्हाला येथील ५० एकरांवरील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये भरविता येईल, असे सांगत त्यांनी इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरला हिरवा कंदील मिळाल्याचे अप्रत्यक्षपणे नमूद केले. आधीच्या सरकारने कॅबिनेट सब कमिटीची, हाय पॉवर कमिटीची बैठक झाली नाही, म्हणून वेदांता आणि एअरबस कंपन्या गेल्याचे त्यांनी सांगितले.

मोठ्या उद्योगांप्रमाणे लघु उद्योगांनाही ‘रेड कार्पेट’
महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात उद्योग पसरला पाहिजे. आम्ही कुणावर मेहरबानी करीत नाही, तर आमचे सरकार कर्तव्य करीत असते. मोठ्या उद्योगांना जसे ‘रेड कार्पेट’ अंथरले जाते, तसेच छोट्या उद्योगांना ‘रेड कार्पेट’ सुविधा देण्याची घोषणा उद्योेगमंत्र्यांनी यावेळी केली.

फूड पार्क, वैजापूर, सिल्लोड एमआयडीसीचे आचारसंहितेनंतर उद्घाटन
बिडकीन डीएमआयसीमध्ये फूड पार्क, वैजापूर आणि सिल्लोड येथील एमआयडीसीचे उद्घाटन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर करण्याची घोषणा सामंत यांनी केली.

Web Title: Green Light to Proposed International Convention Center in Auric; Indirect announcement made by Industrial Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.