शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

त्रुटींच्या पूर्ततेस हिरवा कंदिल!

By admin | Updated: April 20, 2016 23:56 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत अतिरिक्त गुरूजींचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावित आहे. असे असतानाच काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत अतिरिक्त गुरूजींचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावित आहे. असे असतानाच काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी कमी वर्गखोल्या दाखविल्यामुळे तब्बल ६५ पदे कमी झाली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ‘सीईओं’च्या सूचनेनुसार शिक्षण विभागाकडून शासनस्तरावर पाठपुरवा केल्यानंतर शासनाने संचमान्यतेतील त्रुटींच्या पूर्ततेस हिरवा कंदिल दिला आहे. तसा आदेशही प्राप्त झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात किमान ८० ते ८४ पदे वाढणार आहेत. त्यामुळे ही बाब अतिरिक्त शिक्षकांसाठी दिलासादायक ठरणारी आहे.जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होत आहे. त्यामुळे त्याच गतीने शिक्षकही अतिरिक्त होत आहेत. परिणामी शिक्षण विभागाला सातत्याने अशा गुरूजींच्या आंदोलनाला तोंड द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेवून शिक्षण विभागाने तातडीने संचमान्यता तयार करून शासनाला सादर केली. जणेकरून पदे वाढू अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागेल, हा या मागचा उद्देश. असे असतानाच शाळांची माहिती सॉप्टवेअरमध्ये भरताना काही मुख्याध्यापकांनी आहे त्या पेक्षा वर्ग खोल्यांची संख्या कमी दर्शविली. परिणामी शिक्षकांची पदे वाढण्याऐवजी ६५ ने कमी झाली. परिणामी अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न आणखी जटील बनला. ही बाब लक्षात आल्यानंतर सीईओंच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शासनस्तरावर याबाबत पत्रव्यवहार केला. तसेच प्रत्यक्ष भेटूनही सदरील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी मंजुरी द्यावी, अशी विनंती केली होती. ही बाब लक्षात घेवून शासनाने अखेर संचमान्यतेतील त्रुटींची पूर्तता करण्यास हिरवा कंदिल दिला आहे. शिक्षण विभागाला १८ मार्च रोजी तसे पत्रही मिळाले आहे. सर्व प्रकारच्या त्रुटी दूर झाल्यानंतर जिल्ह्याला ६५ ते ६६ पदे वाढून मिळतील, असे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मागील अनेक वर्षांपासून माराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांची संचमान्यता एकत्रित केली जात होती. त्यामुळे शिक्षकांची पदे गरजेच्या प्रमाणात उपलब्ध होत नव्हती. हा प्रश्न लक्षात घेवून शिक्षण विभागाकडून शासनस्तरावर पाठपुरवा करण्यात आला. काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘व्हीडीओ कॉन्फरन्स’मध्येही सदरील अडचण शिक्षणाधिकारी जगताप यांनी मांडली होती. त्यावर शासनाने याची दखल घेत मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांची संचमान्यता आता वेगेगवेगळी केली जाणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यासाठी वाढीव १९ पदे मंजूर होणार आहेत.