शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान

By admin | Updated: October 9, 2014 00:49 IST

औरंगाबाद : मतदानाच्या दिवशी औरंगाबाद मध्य मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारीच आपला मतदानाचा हक्क बजावला.

औरंगाबाद : मतदानाच्या दिवशी औरंगाबाद मध्य मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारीच आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्यात आला.विधानसभेसाठी राज्यात १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांतील एकूण २७४७ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १६ हजार ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना विधानसभा मतदारसंघनिहाय प्रशिक्षण दिले जात आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघात १७०० कर्मचारी लागणार असून या कर्मचाऱ्यांना आज दुसरे प्रशिक्षण देण्यात आले. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात हे प्रशिक्षण पार पडले.मतदानाच्या दिवशी हे कर्मचारी विविध मतदान केंद्रांवर कर्तव्यावर राहणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना त्या दिवशी मतदानाचा हक्क बजावणे शक्य होणार नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी आज मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या कर्मचाऱ्यांनी तसे विनंती अर्ज केले होते, अशा जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांना आज येथे मतदानासाठी मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. संबंधित मतदार ज्या मतदारसंघातील असेल, त्या मतदारसंघाची मतपत्रिका येथे उपलब्ध करून देण्यात आली होती. मतपत्रिकेवर मत नोंदविल्यानंतर या मतपत्रिका मतपेटीत बंद करून टाकण्यात येत होत्या. जिल्ह्यातील सर्व नऊही मतदारसंघांच्या मतपत्रिका येथे उपलब्ध होत्या.