शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बनावट जॉबकार्ड वापरून शासनाला लाखोंचा चुना

By admin | Updated: July 28, 2014 00:52 IST

जिंतूर : तालुक्यातील मोहखेडा येथे बनावट जॉबकार्ड वापरुन शासनाला हजारो रुपयांचा चुना लावणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, तांत्रिक पॅनल अधिकारी व ग्रामरोजगार सेवकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल

जिंतूर : तालुक्यातील मोहखेडा येथे बनावट जॉबकार्ड वापरुन शासनाला हजारो रुपयांचा चुना लावणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, तांत्रिक पॅनल अधिकारी व ग्रामरोजगार सेवकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिंतूर न्यायालयाने दिले आहेत.मोहखेडा येथे मग्रारोहयोअंतर्गत १४ लाख ५६ हजार ४७१ रुपयांचा निधी हाटकर, धनगर व बौद्ध समाजाच्या सामूहिकरित्या असणाऱ्या स्मशानभूमीच्या कामाकरीता आला होता. या निधीचा उपयोग करीत असताना मोहखेडा येथील सरपंच विनायक राठोड, ग्रामसेवक अनिल जुमडे, रोजगार सेवक बापूराव फुलारे, तांत्रिक पॅनल अधिकारी अशोक मगर यांनी संगनमत करुन बोगस, मर्जीतील जॉबकार्डधारक मजूर दाखवून निधीचा अपहार केला. याप्रकरणी तक्रारदार कैलास संतुकराव गडदे यांनी जिंतूर पोलिस व पोलिस अधीक्षक परभणी यांना लेखी तक्रार दिली. गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार केली. परंतु, चौकशी झाली नसल्याने त्यांनी जिंतूर न्यायालयात फिर्याद दाखल केली. या संदर्भात न्यायालयाने वरील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिंतूर पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणात गंगाराम अंभुरे यांच्या नावावर १७८२ रुपये, मीनाबाई अंभुरे यांच्या नावावर ८८२ रुपये उचलले. हे पती-पत्नी मागील कित्येक वर्षांपासून गावामध्ये राहत नाहीत. याच योजनेअंतर्गत शिवाजी बनसोडे यांच्या शेतात मातीनाला बांध करण्यात आला. या कामावर नामदेव जाधव व त्यांच्या पत्नी यांना मजूर दाखविण्यात आले आहेत व त्यांच्या नावावर ७ हजार ८१२ रुपये उचलून अपहार केला. हे दोघेही मुंबई येथे कार्यरत असून नामदेव जाधव हे एस.टी.मध्ये चालक आहेत. सदर प्रकरणात न्यायालयाने संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.(वार्ताहर)एस.टी.चालकाच्या नावानेही उचलले पैसे या प्रकरणात संबंधित यंत्रणेतील सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक व तांत्रिक पॅनल अधिकारी यांनी नामदेव जाधव यांच्या नावावर ७ हजार ८१२ रुपये उचलले. वास्तविक जाधव हे मागील १० वर्षांपासून एस.टी. महामंडळ वसई आगार येथे चालक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या माघारी बोगस जॉबकार्ड तयार करुन ही रक्कम उचलण्यात आली. मुलांच्या नावावरही पैसे सरपंच विनायक राठोड यांची दोन मुले संदीप व प्रदीप हे उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात. त्यांनाही मजूर दाखवून त्यांच्या नावावर ७ हजार ८१२ रुपये उचलून अपहार केला. या दोन्ही प्रकरणात न्यायालयाला सबळ पुरावा दिसल्याने न्यायालयाने तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.मनरेगा पुढाऱ्यांचे कुरणजिंतूर तालुक्यातील मनरेगा पुढाऱ्यांसाठी आयते कुरण सापडले आहे. या योजनेच्या माध्यमातून बोगस हजेरीमस्टर, बोगस कामे व अधिकाऱ्याला हाताशी धरुन बोगस मोजमापपुस्तके करुन लाखोंचा गंडा शासनाला घालण्याचे काम जिंतूर तालुक्यात अनेक राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांकडून होत आहे. या कामावर जिल्हा प्रशासनाला अंकुश लावलेला नाही.