शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

खुशखबर ! 'मराठवाड्याची लाईफलाईन' जायकवाडी धरणात ५१ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 20:10 IST

मराठवाड्याची लाईफ लाईन असलेला जायकवाडी प्रकल्प यंदा स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पाण्याने भरत असल्याने मोठे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देदोन महिन्यात जलाशयाची पाणी पातळी चार फुटाने वाढली आहे जायकवाडी धरणात १ जून रोजी ३६.५५% जलसाठा होता.

- संजय जाधव

पैठण : जायकवाडी धरणाचा जलसाठा शनिवारी सकाळी @ ५१% झाला असून जायकवाडीच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरणात २२०२६ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. विशेष म्हणजे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्यावर नेहमी अवलंबून असलेले जायकवाडी धरण या भागातून पाण्याचा एक थेंब आलेला नसताना यंदा ५१% भरले आहे. दुसरीकडे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहात मात्र अपेक्षेप्रमाणे अद्याप जलसाठा झालेला नाही. मराठवाड्याची लाईफ लाईन असलेला जायकवाडी प्रकल्प यंदा स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पाण्याने भरत असल्याने मोठे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

जायकवाडी धरणात १ जून रोजी ३६.५५% जलसाठा होता. दरम्यान जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद, कन्नड, वैजापूर, गंगापूर, पैठण, शेवगाव, नेवासा, कोपरगाव, शिर्डी, येवला, राहुरी आदी भागात दोन महिण्यात पावसाने सातत्य राखत जोरदार हजेरी लावली. या भागातील ( मुक्त पाणलोट क्षेत्र) पावसाचे पाणी विना अडथळा सरळ जायकवाडी धरणात येऊन मिळते. १ जून पासून धरणाच्या जलसाठ्यात मुक्त पाणलोट क्षेत्रातून  ४२३ दलघमी ( १५ टिएमसी) पाणी दाखल झाले असून जलसाठ्यात १४.५०%  वाढ झाली आहे. दोन महिन्यात जलाशयाची पाणी पातळी चार फुटाने वाढली आहे असे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.जायकवाडी धरणात शनिवारी सायंकाळी १८४५.८५८ दलघमी (६५.१७ टिएमसी) एकूण जलसाठा झाला होता. या पैकी ११०७.७५२ दलघमी (३९.११ टिएमसी) उपयुक्त जलसाठा आहे. धरणात ५१% जलसाठा झाला असल्याचे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे व संदिप राठोड यांनी सांगितले. जायकवाडी धरणावर गत वर्षी आजच्या तारखे पर्यंत १२१ मि मी पाऊस झाला होता तर यंदा ५२९ मि मी पावसाची नोंद झालेली आहे. गतवर्षी आजच्या तारखेस जायकवाडीचा जलसाठा उणे ( - २.९६%) ईतका होता असे  धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.जायकवाडी धरणात अपेक्षित जलसाठा झाल्याने धरणातून पिण्यासाठी व सिंचनासाठी नियोजना प्रमाणे पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  मोठा पावसाळा अद्याप बाकी असून ऑक्टोबर पर्यंत धरणात आवक सुरू असते त्यामुळे यंदा धरण १००% भरणारच अशी अपेक्षा अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली.

मराठवाड्यातील धरणात ५२.६४% जलसाठा.....मांजरा व सिना कोळेगाव वगळता पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मराठवाड्यातील धरणात ५२.६४% उपयुक्त जलसाठा झाला  असल्याची माहिती अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली आहे. सिना कोळेगाव ( उणे - ९६%) व मांजरा ( उणे ४.४२%) असा जलसाठा आहे. ही दोन धरणे वगळली तर निम्न दूधना ३३.९९%, येलदरी ७८.४५%, सिद्धेश्वर ६१.७१%, माजलगाव ५८.५३%, पैनगंगा ५१.७६%, मानार ६५.८३%, निम्न तेरणा ०.५८% व विष्णूपुरी धरणात ८४.६१%, जलसाठा झाला आहे. या सर्व धरणातील एकूण उपयुक्त जलसाठा ५१५२.७९ दलघमी असून आज रोजी या धरणात २७१२.८१ दलघमी जलसाठा झाला आहे.

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा.....गेल्या काही वर्षात नाशिक व अहमद नगर जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेल्या पाण्यावरच जायकवाडी अवलंबून होते. परंतु यंदा जायकवाडी धरणात ५१% जलसाठा झालेला असताना दोन्ही जिल्हातील धरणात अपेक्षित जलसाठा होऊ शकला नाही. जायकवाडीच्या उर्ध्व भागातील धरणाचा जलसाठा पुढील प्रमाणे.करंजवन १८.८२%, वाघाड ११.९५%, ओझरखेड ४०.५६%, पालखेड ३२.१७%, गंगापूर ५५.२२%, गौतमी २१.०७%, कश्यपी २४.९०%, कडवा २२.४५%, दारणा ६९.४३%, मुकणे २८.३७%,  भंडारदरा ४८.५०%, निळवंडे ४९.२४%,  मुळा ३३.३७% असा जलसाठा आजरोजी आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊसWaterपाणी