गुड न्यूज! छ. संभाजीनगर पाणी पुरवठा: जायकवाडीचे पाणी १८.८ किमी कौडगावपर्यंत पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 17:35 IST2026-04-02T17:31:52+5:302026-04-02T17:35:01+5:30

पाणी प्रश्नावर मोठा अपडेट: २५०० मिमी व्यासाच्या वाहिनीतून पाण्याचा विसर्ग; उन्हाळ्यात शहराला मिळणार अतिरिक्त २०० एमएलडी पाणी.

Good News! Ch. Sambhajinagar Water Supply: Jayakwadi water reached 18.8 km to Kaudgaon | गुड न्यूज! छ. संभाजीनगर पाणी पुरवठा: जायकवाडीचे पाणी १८.८ किमी कौडगावपर्यंत पोहोचले

गुड न्यूज! छ. संभाजीनगर पाणी पुरवठा: जायकवाडीचे पाणी १८.८ किमी कौडगावपर्यंत पोहोचले

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यात शहराची तहान भागावी, अतिरिक्त २०० एमएलडी पाणी मिळावे यासाठी २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी सध्या सुरू असून, सोमवारी (दि. ३०) १८:८ किमीपर्यंत जायकवाडीचे पाणी आणण्यात यश आले. कौडगावपर्यंत जलवाहिनी स्वच्छ करण्यात आली असून, बुधवारी तपासणीत कोणतीही अडचण आली नसल्याचे मजीप्रा, मनपातर्फे कळविण्यात आले. एप्रिलअखेरपर्यंत शहराला मुबलक पाणी मिळावे, यासाठी मनपाचे सर्वाधिक प्रयत्न सुरू आहेत.

२३ मार्चपासून जलवाहिनीच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. जायकवाडी धरणात जॅकवेलपासून नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ३८ किमी अंतरात २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकलेली आहे. बुधावारी (दि.१) दुपारी १ वाजता जायकवाडीत जॅकवेलवरील दोन्ही पंप सुरू करण्यात आली. ३७०० हॉर्सपॉवरचा एक पंप आहे. त्यातील एक पंप ‘ट्रिप’ झाला. त्यानंतर दुपारी ४:३० पर्यंत एकाच पंपावर कौडगावपर्यंत पाणी आणण्यात आले. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या स्कोअर व्हॉल्व्हमधून घाण पाणी बाहेर काढण्यात आले. गुरुवारी दुपारी पुन्हा कौडगावपासून पुढे पाणी नेण्याची प्रक्रिया सुरू होईल. १४ एप्रिलपूर्वी नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी नेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्तांकडून आढावा

न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या समितीने बुधवारी रात्री नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आढावा घेतला. बैठकीत जलकुंभ उभारणीस गती देणे, ज्या वसाहतींमध्ये नवीन जलवाहिन्या टाकायच्या आहेत, त्या त्वरित टाकणे, नक्षत्रवाडी जलशुद्धीकरणातून पाणी शहरात लवकरात लवकर कसे आणता येईल, यावर भर देण्यात आला. जीव्हीपीआर कंपनीने आम्हाला निधी मिळत नसल्याचे म्हणणे मांडले. त्याचप्रमाणे नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी अनेक ठिकाणी रोड फोडावे लागत आहे. त्यासाठी परवानगी मिळत नाही. रोड दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार बैठकीत केली.

Web Title : खुशखबरी! छत्रपति संभाजीनगर जलापूर्ति: कौडगाँव तक पहुँचा जायकवाड़ी का पानी

Web Summary : छत्रपति संभाजीनगर जलापूर्ति के लिए जायकवाड़ी का पानी सफलतापूर्वक कौडगाँव (18.8 किमी) तक पहुँचा। पाइपलाइन की सफाई पूरी; जल शोधन के प्रयास जारी। अप्रैल अंत तक शहर को पर्याप्त पानी देने का लक्ष्य। सड़क मरम्मत निधि के मुद्दे उठे।

Web Title : Good News! Chhatrapati Sambhajinagar Water Supply: Water Reaches Kaudgaon

Web Summary : Jaikwadi water successfully reached Kaudgaon (18.8 km) for Chhatrapati Sambhajinagar's water supply. Pipeline cleaning is complete; water purification efforts are underway. Aiming for ample water supply to the city by April end. Road repair fund issues raised.