शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

१० रुपये एलबीटी भरणाऱ्यांना दंड नोटिसा द्या

By admin | Updated: August 2, 2014 01:43 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील व्यापाऱ्यांनी एलबीटी कराला विरोध करण्याचे हत्यार उपसले होते. त्यांनी ते मागे घेतले

औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील व्यापाऱ्यांनी एलबीटी कराला विरोध करण्याचे हत्यार उपसले होते. त्यांनी ते मागे घेतले असले तरी मे व जून महिन्यात २२५ व्यापाऱ्यांनी एलबीटीचा निषेध म्हणून १० रुपये एलबीटी भरणा केला. त्या व्यापाऱ्यांकडून व्याजासह १२ लाख रुपये एलबीटी आकारण्याची भूमिका पालिका प्रशासनाने घ्यावी, यासाठी शिवसेना सरसावली आहे. सेनेच्या मागणीवरून येत्या आठवड्यात व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ सूत्रांकडून समजले आहे. एलबीटी कर वेळेत न भरल्यास २ टक्के व्याजदराने कर आकारणी करण्यात येईल. सभापती विजय वाघचौरे यांनी याप्रकरणी आयुक्तांना पत्र दिले आहे.व्यापाऱ्यांनी सध्या एलबीटी भरण्यास सुरुवात केली असली, तरी १० रुपये भरण्याच्या काळात शहरात कोट्यवधी रुपयांच्या मालाची आयात झाली आहे. त्यावरील एलबीटी व्यापाऱ्यांनी कशा पद्धतीने भरला आहे. याची गोळाबेरीज करण्याचे आदेश एलबीटी विभागाला देण्यात आले आहेत. दोन महिन्यांतील असहकारामुळे मनपाचा १४ कोटी रुपयांचा एलबीटी बुडाला. सहनशीलतेचा अंत झाल्यामुळे मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यापाऱ्यांना एलबीटी भरण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. मुदतीत करभरणा न केल्यास व्याजासह वसुलीचा इशारा नोटीसमधून देण्यात आला होता. त्या नोटिसीला व्यापाऱ्यांनीही प्रत्युत्तर दिले होते. ५ कोटींच्या एलबीटीवर दंड ५ कोटी रुपयांच्या एलबीटीवर २ टक्के व्याज आकारून १२ लाख रुपये वसूल करण्यात येणार आहेत. २३ हजार किरकोळ, तर ६ हजार ५०० ठोक व्यापाऱ्यांची एलबीटी विभागाकडे नोंद आहे. किरकोळ, ठोक व्यापाऱ्यांचाही आकडा वाढतो आहे. इन्कम व सेल्स टॅक्स विभागही पालिकेकडील माहितीचा आधार घेते. कायदा काय सांगतोमहाराष्ट्र मनपा अधिनियम १९४९ च्या कलम ६७/२ नुसार मनपा हद्दीत मनपाचे शासन चालते. त्यामुळे एलबीटी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर या कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते.