शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या पित्याचा मजनूकडून खून

By admin | Updated: May 17, 2016 00:27 IST

औरंगाबाद : ‘तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न का लावून दिले नाही’ असे म्हणत तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या वडिलांचा तिच्या मावस भावाच्या

एकतर्फी प्रेम : मुलगी देण्यास नकार; वरातीतच हल्लाऔरंगाबाद : ‘तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न का लावून दिले नाही’ असे म्हणत तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या वडिलांचा तिच्या मावस भावाच्या लग्नाच्या वरातीतच चाकूने भोसकून खून केला. यावेळी तरुणीच्या मावस भावावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री बीड बायपास रोडवरील प्रसाद लॉनजवळ घडली. सदाशिव मोदाजी जाधव (४५, रा. निर्मलनगर) असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. तर हल्ल्यात राजू सर्जेराव पाईकराव (२८, रा. निर्मलनगर) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हे कृत्य करणाऱ्या संदेश ऊर्फ बाळू सुरेश पटेकर (२०), त्याचे वडील सुरेश लक्ष्मण पटेकर (४५) व काका गोरख अंबादास कोकणे (३३, रा. तिघेही निर्मलनगर, मुकुंदवाडी, रेल्वेस्टेशन परिसर) या तिघांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली.घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी संदेश पटेकर आणि मयत सदाशिव जाधव हे निर्मलनगरात शेजारी शेजारीच राहतात. संदेश हा जाधव यांच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. त्याने अनेकदा तिला मागणी घातली होती. विशेष म्हणजे संदेशने आपल्या आई- वडिलांनाही मागणीसाठी जाधव कुटुंबाच्या घरी पाठविले होते; परंतु जाधव यांनी संदेशला आपली मुलगी देण्यास स्पष्ट नकार दिला. नकारानंतर लगेच जाधव यांनी दुसरा चांगला मुलगा शोधून आपल्या मुलीचा थाटामाटात विवाह लावून दिला. मुलगी दिली नाही म्हणून संदेशबरोबरच त्याच्या घरच्या मंडळींनाही जाधव कुटुंबाबाबत प्रचंड राग मनात खदखदत होता. आपल्या या अपमानाचा बदला घ्यायचाच, असा विचार पटेकर कुटुंब करीत होते. अखेर रविवारी या कुटुंबाने डाव साधला.वरातीच्या गोंधळात केला हल्ला!सदाशिव जाधव यांच्या साडूचा मुलगा विजू पाईकराव याचा काल रात्री बीड बायपास रोडवरील प्रसाद लॉनवर विवाह समारंभ होता. सायंकाळी नवरदेवाची वरात निघाली. या वरातीत जाधवही सहभागी झाले होते. वाद्यावर नाच-गाणे सुरू असतानाच अचानक आरोपी संदेश ऊर्फ बाळू, त्याचे वडील सुरेश आणि काका गोरख कोकणे वरातीत आले. वास्तविक पाहता त्यांना लग्नाचे आमंत्रणच नव्हते. जाधव आणि पटेकर समोरासमोर (पान २ वर)तीन आरोपींना अटकघटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी ठाण्याचे फौजदार कल्याण शेळके, ताहेर पटेल, कर्मचारी प्रकाश सोनवणे, विजय चौधरी, गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर आरोपींचा शोध सुरू केला. अखेर पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास आरोपी संदेश ऊर्फ बाळू, त्याचा बाप सुरेश पटेकर आणि काका गोरख कोकणे हे तिघे पोलिसांच्या हाती लागले. या तिघांना अटक करण्यात आली. तिघांविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात खून आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. लग्न मंडपात शोककळाहा प्रकार लग्न मंडपापासून हाकेच्या अंतरावर घडला. हल्ला करून तिन्ही आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून सर्व लोकांसमोर तेथून धूम ठोकली. या प्रकाराची माहिती लग्न मंडपात येऊन धडकताच तेथील आनंदावर विरजण पडले. शोककळा पसरली. रडारडी सुरू झाली. अशाच शोकावस्थेत तात्काळ लग्न उरकण्यात आले. जखमी सदाशिव जाधव यांना घाटीत आण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. तर राजूला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.