शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या तोंडावर कचऱ्याच्या ढिगारे

By admin | Updated: June 23, 2014 00:25 IST

चंद्रकांत देवणे , वसमत शहरात प्रवेश करतानाच प्रवेशाच्या मुख्य रस्त्यावर कचऱ्यांचे ढिगारे व कोंबड्यांच्या पंखांची दुर्गंधी स्वागतासाठी सज्ज असते,

चंद्रकांत देवणे , वसमत
शहरात प्रवेश करतानाच प्रवेशाच्या मुख्य रस्त्यावर कचऱ्यांचे ढिगारे व कोंबड्यांच्या पंखांची दुर्गंधी स्वागतासाठी सज्ज असते, हे दृश्य पाहूनच वसमत शहरातील गल्लीबोळात स्वच्छतेचे काय हाल असतील? याचा अंदाज शहरात प्रथम येणारे पाहुणे लावत असतात. न. प. च्या दुर्लक्षामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे.
वसमत नगरपालिकेच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. शहरात स्वच्छता असावी लागते. शहर स्वच्छ असावे लागते. शहरातील महिलांना व नागरिकांना बाजारातून पायी ये-जा करताना त्रास होवू द्यायचा नसतो, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सुविधा पुरवायच्या असतात, हे वसमत नगर पालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना माहितच नसावे , असे चित्र सध्या वसमत शहराचे झाले आहे. चोहीकडे घाण, गटारगंगा व दुर्गंधीचे साम्राज्य वसमतमध्ये पहावयास मिळत आहे. नगरपालिकेच्या कारभारावर नगराध्यक्षांचे व सदस्यांचे नियंत्रण नसल्यावर काय अवस्था होते, याचे दर्शन वसमत शहरात प्रवेश करतानाच घडते. इतर गावात प्रवेश करताना ‘नगरपालिकेच्या वतीने या शहरात आपले स्वागत आहे’ असे फलक पहावयास मिळतात. वसमत नगरपालिकेला असा फलक लावण्याची गरजच वाटली नसल्याने असा फलक पहावयास मिळत नाही. परंतु शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्याच्या कडेला घाणीचे, दुर्गधीचे व कचऱ्याचे साम्राज्य मात्र हमखास दिसते. परभणी रस्त्यावरून येताना शहरात सुरूवातीलाच दादऱ्याजवळ नगर पालिकेने शहरातून उचललेला कचरा वाहनाद्वारे आणून टाकला असल्याचे व त्याचे ढिगारे उभे असल्याचे विचित्र चित्र पहावयास मिळते. कचरा- घाण अशी शहराच्या प्रवेशद्वाराजवळ व रस्त्याच्या कडेला जमा करण्याची ही पद्धत फक्त वसमत न. प. चाच पॅटर्न असावा, अशीच परिस्थिती आहे. परभणी रस्त्यावर झालेले हे कचऱ्याचे ढिगारे दुर्गधी पसरवतात, या प्रकाराकडे आजवर कधीच नगरपालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे लक्ष गेले नाही, हे विशेष. रेल्वेस्थानक रस्त्यावर शहराचे ग्रामदैवत असलेल्या शिवशिवेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराकडे महिला व भाविक दररोज ये-जा करत असतात. त्यांनाही दर्शनासाठी गटारगंगेतूनच जावे लागते आहे. एवढ्या दुर्गंधीयुक्त वातावरणातून शहरात पाय ठेवतानाच मुख्य शहरात काय अवस्था असेल, याचे गणित मांडतच प्रवासी शहरात दाखल होत असतात.
नांदेडकडून वसमत शहरात येतानाही बकाल अवस्था आहे. चंदगव्हाण पाटीपासून शहरापर्यंत अनेक जागी कचऱ्याचे ढिगार टाकलेले पहावयास मिळतात. हा कचरा अक्षरश: नगरपालिकेच्या वाहनाद्वारेच रस्त्याच्या कडेला टाकला जातो, हे विशेष. उघडी नदीजवळ येताच दुर्गंधीचा दर्प नाकाला झोंबतो. हा उग्रदर्प शहरातील उघड्यावर मांसविक्री करणारांनी दुकानातील शिल्लक अवशेष, मांसाचे तुकडे व कोंबड्यांच्या पंखाचा आहे. एसटीतून जातानाही हा उग्र दर्प प्रत्येकाला नाकाला रूमाल लावण्यास भाग पाडत असतो.
४गेल्या वर्षभरापासून शहर अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडले असताना सर्वांचे त्याकडे दुर्लक्ष झाले.
प्रवाशांना होतोय मानसिक ताण
औंढा रस्त्याने वसमत शहरात प्रवेश करताना अगदी नागरी वस्तीजवळच रस्त्याच्या कडेला कोंबड्यांच्या पंखांचे ढिगारे व दुर्गंधीयुक्त उकिरडा आपले स्वागत करत असतो. हा रस्ता पार करतानाही उग्र दर्प येतो. या सर्व प्रकारामुळे शहरातून ये-जा करणारे प्रवासी, वाहनधारक त्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. रेल्वे मार्गे येणाऱ्या प्रवाशांना तर शहरात पाय ठेवताच गटारगंगा ओलांडावी लागते. रेल्वे स्थानकावरून काजीपुऱ्यापर्यंत मुख्य रस्त्यावर गटाराचे पाणी नेहमी आपल्या स्वागताला हजर असते. त्यामुळे रेल्वे स्थानकावरून पायी शहरात येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो.
गेल्या वर्षभरापासून शहर अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडले आहे. मात्र या परिस्थितीची नगरपालिकेचे कर्ते करविते व सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाने कधी दखल घेतलेली नाही. परिणामी वसमत शहराच्या स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.