गंगापूर उपसा सिंचन योजनेचे काम ६ महिन्यांपासून ठप्प; ठेकेदाराला प्रतिदिन २५ हजार रुपये दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:27 IST2025-10-31T17:24:54+5:302025-10-31T17:27:45+5:30
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पातून जलवाहिनीद्वारे शेतीसाठी पाणी देणाऱ्या गंगापूर उपसा सिंचन योजनेचे काम ...

गंगापूर उपसा सिंचन योजनेचे काम ६ महिन्यांपासून ठप्प; ठेकेदाराला प्रतिदिन २५ हजार रुपये दंड
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पातून जलवाहिनीद्वारे शेतीसाठी पाणी देणाऱ्या गंगापूर उपसा सिंचन योजनेचे काम मागील सहा महिन्यांपासून बंद पडले आहे. वारंवार सांगूनही काम सुरू न करणाऱ्या ठेकेदाराला पाटबंधारे विभागाने प्रतिदिन २५ हजार रुपये दंड ठोठावला.
जायकवाडी प्रकल्पाचा अर्धाअधिक जलसाठा गंगापूर तालुक्यात होतो; परंतु तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांतील शेतीला सिंचनासाठी पाणी मिळत नाही. यामुळे शासनाने दोन वर्षांपूर्वी गंगापूर उपसा सिंचन योजना मंजूर केली. यामुळे गंगापूर तालुक्यातील दहा हजार एकर जमीन ओलिताखाली येईल. त्यासाठी ३४.८० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. मुंबईच्या व्ही. यू.बी. गोवर्धनी यांना ४०० कोटी रुपये खर्चाचे हे काम देण्यात आले. आतापर्यंत ठेकेदाराने केवळ ९० कोटी १२ लाख रुपयांचे काम पूर्ण केले. निविदेतील अटींनुसार दीड वर्षात १७४ कोटी २ लक्ष रुपये किमतीचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. ३६ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची मुदत आहे. कामे गतीने करावे, यासाठी आ. प्रशांत बंब यांनीही १५ मे रोजी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. मात्र, ठेकेदाराने दुर्लक्ष केले. यामुळे २९ ऑगस्टपासून ठेकेदाराला दंड आकारण्यात येत आहे.
दंड वसूल केला
योजनेचे काम ३६ 66 महिन्यांत पूर्ण करण्याची अट आहे. सहा महिन्यांपासून काम ठप्प आहे ठेकेदाराला महिन्यापासून प्रतिदिन २५ हजार रुपये दंड आकारला. त्यांच्या बिलातून आतापर्यंत २२ लाख रुपयांचा
दंड वसूल करण्यात आला. 
- उमेश वानखेडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग.