शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांसाठी पावणेसहा कोटींचा निधी

By admin | Updated: September 7, 2014 00:23 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बहुतांश पालिकांतर्गतच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हीच बाब लक्षात घेवून शासनाने जिल्ह्यातील पालिकांसाठी २९ लाख ८६ हजार ४३६ तर

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बहुतांश पालिकांतर्गतच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हीच बाब लक्षात घेवून शासनाने जिल्ह्यातील पालिकांसाठी २९ लाख ८६ हजार ४३६ तर वैशिष्ट्यपूर्ण योजनांसाठी ५ कोटी ५९ लाख ८४ हजार ५५९ रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न व विविध उपक्रम मार्गी लागणार आहेत.उस्मानाबाद पालिकेसोबतच अन्य शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मात्र पालिकांकडे निधीची कमतरता असल्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती होत नव्हती. बहुतांश पालिकांनी शासनाकडे रस्ता दुरुस्तीसाठी अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने जिल्ह्यातील पालिकांना रस्ता दुरुस्तीसाठी अनुदान मंजूर केले आहे. मंजूर अनुदानाचा आकडा २९ लाख ८६ हजार ४३६ इतका आहे. यामध्ये भूम पालिकेला १ लाख ९७ हजार २२४, कळंब २ लाख ७३ हजार २१९, मुरुम १ लाख ९५ हजार २०५, नळदुर्ग १ लाख ९४ हजार ८८७, उस्मानाबाद ११ लाख ८८ हजार २२२, परंडा १ लाख ९९ हजार ३१७, तुळजापूर ३ लाख ६१ हजार ३९२ आणि उमरगा पालिकेसाठी ३ लाख ७६ हजार ३६९ रुपये रस्ता अनुदान मिळाले आहे. ही सर्व रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली आहे. ही रक्कम दोन टप्प्यामध्ये वर्ग केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १७ लाख ९१ हजार ८३२ तर दुसऱ्या टप्प्यात ११ लाख ९४ हजार ५७५ रुपये वितरित केले जातील. वैशिष्ट्यपूर्ण योजनांतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी शासनाने सर्वाधिक ५ कोटी ५९ लाख ८४ हजार ५५९ रुपये इतके अनुदान मंजूर केले आहे. यामध्ये भूम पालिकेसाठी १ कोटी, कळंबसाठी ५० लाख, मुरुमसाठी ५० लाख, नळदुर्गसाठी ७० लाख, उस्मानाबादसाठी २ कोटी, परंडासाठी ५० लाख तर तुळजापूर पालिकेसाठी ३९ लाख ८४ हजार ५५९ रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. याही अनुदानाची रक्कम दोन टप्प्यामध्येच दिली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ३ कोटी ३५ लाख ९० हजार ७३५ तर दुसऱ्या टप्प्यामध्ये २ कोटी २३ लाख ९३ हजार ८२४ रुपये अनुदान दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्ह्याला जवळपास साडेपाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे. ७ पैकी केवळ दोन पालिकांना ५० टक्के निधी देण्यात आला आहे. उस्मानाबाद पालिकेला सर्वाधिक २ कोटी तर भूम पालिकेला १ कोटी रुपये मिळाले आहेत. सर्वात कमी निधी तुळजापूर पालिकेला मिळाला असून, ३९ लाख ८४ हजार ५५९ एवढी अनुदानाची रक्कम आहे.