फेसबुकवरील मैत्री पडली महागात! छत्रपती संभाजीनगरच्या महिला व्यावसायिकाला ५ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 18:39 IST2026-02-14T18:39:46+5:302026-02-14T18:39:54+5:30

आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट, अनेक गुन्हे दाखल

Friendship on Facebook cost a lot! A female businessman from Chhatrapati Sambhajinagar was duped of Rs 5 lakhs | फेसबुकवरील मैत्री पडली महागात! छत्रपती संभाजीनगरच्या महिला व्यावसायिकाला ५ लाखांचा गंडा

फेसबुकवरील मैत्री पडली महागात! छत्रपती संभाजीनगरच्या महिला व्यावसायिकाला ५ लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : फोरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक करून दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ठगाने महिला व्यावसायिकाला ५ लाखांचा गंडा घातला. सातारा पोलिस ठाण्यात गुरुवारी याप्रकरणी सचिन चांदणे (रा. नगवे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार महिलेचा कृषीशी संंबंधित व्यवसाय आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये तिला फेसबुकवर सचिनने फ्रेेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री केली. व्यवसायाविषयी माहिती घेत फोरेक्स मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी आग्रह केला. सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांची पुण्यात भेट झाली. तेव्हा त्याने फोरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परताव्याचे आश्वासन दिले. महिला व्यावसायिकाने टाळाटाळ केली. मात्र कॉल करून त्याने दहा महिन्यांसाठी ५ लाख गुंतवण्याचा आग्रह धरून महिन्याला ६० हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्याच्यावर विश्वास ठेवत महिलेने त्याला ५ लाख रुपये अदा केले. मात्र त्याने त्यानंतर प्रतिसाद देणे बंद केले. महिलेने त्याला वारंवार पैशांची मागणी केली. मात्र त्याने काॅल, मेसेजला प्रतिसाद देणे बंद केले.

चांदणे रेकॉर्डवरील गुन्हेगार
चांदणेवर यापूर्वी करवीर, कागल, गांधीनगर पोलिस ठाण्यांत मारहाणीचे तसेच फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. अशाचप्रकारे त्याने पुण्यातील बावधन येथे कार्यालय असल्याचे सांगून अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

Web Title : फेसबुक दोस्ती पड़ी महंगी: औरंगाबाद की महिला व्यवसायी को ₹5 लाख का चूना।

Web Summary : औरंगाबाद में एक महिला फेसबुक के जरिए एक धोखाधड़ी वाले विदेशी मुद्रा निवेश योजना में फंसकर ₹5 लाख गंवा बैठी। आरोपी सचिन चांदने ने ऊंचे रिटर्न का वादा किया, लेकिन पैसे मिलने के बाद जवाब देना बंद कर दिया। उसका आपराधिक रिकॉर्ड है।

Web Title : Facebook friendship costly: Aurangabad businesswoman defrauded of ₹5 lakh.

Web Summary : A woman in Aurangabad lost ₹5 lakh after being lured into a fraudulent Forex investment scheme via Facebook. The accused, Sachin Chandane, promised high returns but stopped responding after receiving the money. He has a criminal record.